कोल्हापूर, 14 डिसेंबर : आजकाल आपल्याला नवनव्या पद्धतीनं आणि नव्या व्हारयटीचा चहा प्यायला मिळतो. नव्याच्या या गर्दीतही जुन्या गोष्टीवरील काही जणांचं प्रेम कायम असतं.
कोल्हापूरच्या
हॉटेल सुर्यकांतलाही ही गोष्ट अगदी योग्य पद्धतीनं लागू होते. या हॉटेलमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून बंबात चहा मिळतो. 71 वर्षांची परंपरा कोल्हापूरातील पापाची तिकटी चौकात परशुराम पाटील यांनी 1941 च्या सुमारास हे हॉटेल सुरू केले. तेव्हापासूनच त्यांनी हॉटेलमधील पदार्थाची चव कायम राखली आहे. त्यावेळी सगळीकडं मिळणारा बंबातील चहा पाटील यांनीही आपल्या हॉटेलमधून देण्यास सुरूवात केली होती. कालांतराने शहरात बंबात चहा बनवणारी हॉटेल्स हळूहळू बंद झाली. पण हॉटेल सूर्यकांतने आपलं सातत्य टिकवले आहे. त्यामुळेच इथे नेहमीच गर्दी बघायला मिळते. सध्या या हॉटेलमध्ये परशराम पाटील यांची तिसरी पिढी म्हणजेच सुजित पाटील आणि त्यांचे काका सुनिल पाटील तांब्याच्या बंबात चहा बनवतात. साधारणतः पाणी तापवण्यासाठी सध्या हा बंब सर्वत्र वापरला जातो. पण, सुर्यकांत हॉटेलमध्ये मिळणाऱ्या बंबातील या चहाची खासियतच वेगळी आहे.
चहाप्रेमींना पर्वणी, एकाच ठिकाणी मिळतात जगभरातील 20 चहा, Video
आयुर्वेदीक महत्त्व साखरेचे पाणी, चहा पावडर वेगळी आणि दूध वेगळे असे सर्व जिन्नस वेगवेगळे तयार केले जातात. त्यात फक्त वाफेवर बनवला जाणारा चहा असल्याने हा सगळ्यात चांगला चहा, असल्याचं येथील ग्राहक सांगतात. साधारणतः अल्युमिनयम भांड्यात सगळीकडे चहा बनवला जातो. परंतु, त्याला झीज असते आणि ती शरीराला चांगली नसते. मात्र तांब्याच्या भांड्यातल्या चहाला आयुर्वेदिक महत्व देखील आहे. असा चहा आपल्या शरीराला बाधत नाही. या चहामुळे पित्ताचा, अपचनाचा त्रास होत नाही. त्यामुळे आजही लोकांमध्ये हा बंबातला चहा प्रसिद्ध आहे, असे हॉटेलचे मालक सुनील पाटील यांनी सांगितले आहे. असा बनवतात चहा हा चहा बनवताना बंबात सुरुवातीला साखर टाकली जाते. त्यानंतर त्यामध्ये सारखरेला योग्य प्रमाणात असे पाणी ओतले जाते. हे साखरेचे पाणी उकळू लागले की त्यावर एक जग ठेवला जातो. या जगमध्ये बंबातील उकळणारे साखरेचे पाणी घेऊन त्यात चहापूड टाकण्यात येते. त्यानंतर तो जग बंबाला वरच्या बाजूला असलेल्या छिद्रावर ठेवले जाते. खालून साखरेचे पाणी उकळून वाफ या जगला लागत असते. आणि त्या वाटेवरच हा चहा तयार होतो. चहा तयार झाला की कप मध्ये बाजूला गरम केलेले थोडे दूध घेतले जाते. आणि त्या दुधात हा कोरा चहा गाळण्यात येतो.
दुर्गम भागातील तरुणानं सुरू केला आयुर्वेदिक चहाचा व्यवसाय, इतरांसाठी बनला आदर्श, Video
सतत सुरू असते शेगडी या बंबाला खालून सतत आग सुरू ठेवावी लागते. बंबात असलेले साखरेचे पाणी सतत उकळत ठेवावे लागते. बंब थंड झाला तर चहा बनायला भरपूर वेळ लागू शकतो. त्यामुळे हॉटेलमध्ये सकाळी सुरू करण्यात आलेला शेगडीचा गॅस रात्री हॉटेल बंद करतानाच बंद केला जातो. बरेच जुने लोक, नवीन पिढी या ठिकाणी चहा प्यायला येतात. या बंबातील काळा चहा (कोरा चहा) प्यायला देखील बरेच जण येतात तर आमच्या हॉटेलमध्ये मिळणारी ताजी मिसळ, कांदा भजी, मिरची भजी, वडा, शेव चिवडा, कुंदा, आदी पदार्थ देखील लोकांना आवडतात. हा बंबातील स्पेशल हाफ चहाची किंमत 8 रूपये तर फुल चहाची किंमत 10 रुपये आहे. हे हॉटेल सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असते, असे देखील सुनील पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
गुगल मॅपवरून साभार हॉटेलचा पत्ता हॉटेल सुर्यकांत, पापाची तिकटी, कोल्हापूर - 416002 संपर्क (सुजित पाटील) : +919767577753
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.