कोल्हापूर, 8 डिसेंबर : खेमा पराठा खायची इच्छा झाली, तर कोल्हापूरकरांचे पाय हॉटेल मलबार या एकाच ठिकाणाकडं वळतात. गेल्या कित्येक वर्षांपासून हे हॉटेल कोल्हापूरकांचा जीव की प्राण असलेल्या स्पेशल मटण खेमासाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, अस्सल कोल्हापूरी संस्कृतीचा भाग बनलेल्या या हॉटेलचे मालक केरळचे आहेत.
कधी सुरू झालं हॉटेल?
या हॉटेलचे मालक हैद्रोस मलबारी यांनी याबाबतचा इतिहास सांगितला आहे. 'केरळहून कोल्हापूरला आल्यावर आमच्या आई-वडीलांनी हे हॉटेल अगदी छोट्या जागेत सुरु केले होते. 1952 साली या हॉटेलचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. त्यापूर्वीच 1943 सालापासून हे हॉटेल सुरू होते. आमच्या वडिलांनी या हॉटेलला मोठे बनावले. त्यानंतर आमच्या काकांनी कोल्हापुरात राहून इथल्या लोकांच्या खाण्याच्या सवयी जाणून घेतल्या.
त्यांनी कोल्हापूरच्या खाद्यपदार्थांची वैशिष्ट्यं शिकून घेतली आणि ते पदार्थही बनवायला लागले. हळूहळू त्यांचा मटण खेमा ही प्रसिद्ध कोल्हापूरी डिश स्पेशालिटी बनली. आम्ही भाऊ मिळून हे हॉटेल सध्या चालवतो,' अशी माहिती हैद्रोस यांनी दिली.
मातीच्या भांड्यामधे बनवलेली कोल्हापूरच्या रांगड्या चवीची मिसळ, Video
केरळमधील कन्नूर या ठिकाणचे आम्ही रहिवासी आहोत. जेव्हा मी केरळमध्ये असतो, तेव्हा माझा भाऊ कोल्हापुरात हॉटेल सांभाळत असतो. तर भाऊ जेव्हा केरळमध्ये असतो, तेव्हा मी कोल्हापुरात हॉटेल सांभाळतो. पण आम्ही इथे कोल्हापुरात स्थायिक झालेलो नाही आहोत. केरळहून ये-जा करतच आम्ही हे हॉटेल चालवतो, अशी माहिती देखील हैद्रोस यांनी दिली.
कसा बनतो खेमा ?
कोल्हापुरी मटण खेमा ही मलबार हॉटेलची फेमस डिश आहे. मटणाचे अगदी छोटे-छोटे (मिक्सर मध्ये बारीक केल्याप्रमाणे) तुकडे करणे, यालाच खेमा म्हणतात. मटण खेमा बनवताना हा कांदा, टोमॅटो, गरम मसाला असे सगळे जिन्नस घालून पूर्ण व्यवस्थित भाजून घेतला जातो. हा स्पेशल मसाला तयार करून घेऊन त्यात चाॅप केलेला खेमा टाकला जातो. त्यानंतर व्यवस्थित फाय करून हा खेमा तयार होतो.
या मटण खेमा बरोबर परोठा खायला दिला जातो, ही इथली स्पेशल डिश आहे. फक्त खेमा, खेमा फ्राय, खेमा मिक्चर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या खेमाच्या डिशेस इथे मिळतात, असे हॉटेलच्या आचाऱ्यानं सांगितलं.
ब्लूमिंग ऑनियन! कांदा भजीला पर्याय असलेली कोल्हापुरी डिश तुम्ही खाल्लीय?
केरळचे मालक असून देखील कोल्हापुरी पद्धतीचे मांसाहारी अप्रतिम जेवण इथे मिळते, असे खवय्ये सांगतात. या ठिकाणच्या मटण थाळीमध्ये मिळणारे मटण, ग्रेव्ही याची चव ही आखणी सारखी आहे, असे इथे नेहमी जेवायला येणाऱ्या तन्वीर सय्यद यांनी सांगितले. याचबरोबरच इथे मांसाहारी आणि शाकाहारी बाकीचे पदार्थ देखील मिळतात. त्यामुळे बरेचसे कोल्हापूरचे खवय्ये दुपारी 12 ते रात्री 10 पर्यंत या ठिकाणी हमखास गर्दी करतात.
गुगल मॅपवरून साभार
हॉटेलचा पत्ता
मलबार हॉटेल, शाहूपुरी मस्जिद, न्यू शाहूपुरी, स्टेशन रोड, कोल्हापूर - 416001
संपर्क क्रमांक - 098242 86060
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Kolhapur, Local18, Local18 food, Recipie