मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /किल्ले वाचवण्यासाठी मैदानात उतरले 'दुर्गवीर', तरुणाईचं काम पाहून वाटेल अभिमान, Video

किल्ले वाचवण्यासाठी मैदानात उतरले 'दुर्गवीर', तरुणाईचं काम पाहून वाटेल अभिमान, Video

X
Kolhapur

Kolhapur News : आपले गडकिल्ले ही आपली जबाबदारी मानत एक संस्था सध्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्य करत आहे.

Kolhapur News : आपले गडकिल्ले ही आपली जबाबदारी मानत एक संस्था सध्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्य करत आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Kolhapur, India

  साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी

  कोल्हापूर 17 मार्च : आपले गडकिल्ले ही आपली जबाबदारी मानत एक संस्था सध्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्य करत आहे. अनेकानेक किल्ल्यांवर जाऊन तिथे तटबंदी पुन्हा नीट करणे, साफसफाई करून जनजागृती करणे अशी कामे ही संस्था गेली कित्येक वर्षे करत आली आहे. कोल्हापूरच्या गडहिंग्लज येथून या संस्थेच्या कार्याची बीजे रोवली गेली आहेत.

  कधी झाली सुरुवात?

  2008 साली महाराष्ट्रातील अपरिचित दुर्लक्षित गडकोटांच्या संवर्धनसाठी, स्वरंक्षणासाठी आणि जनजागृती करण्याच्या दृष्टीने दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था स्थापित झाली. संतोष गुंडू हासुरकर यांनी काही निवडक सहकाऱ्यांना घेऊन या संस्थेची सुरुवात केली होती. तेव्हापासून आजतागायत या संस्थे मार्फत गड किल्ल्यांसाठीचे कार्य सुरूच आहे. आजवर महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील एकूण 14 गडकोटांवर या संस्थेचे संवर्धनाचे कार्य सुरु आहे.

  तर दुर्गवीर संस्थेने प्रामुख्याने पुरातत्व विभाग, इतिहास अभ्यासक यांच्या मार्गदर्शनाखाली गडकोट संवर्धन केले आहे.

  तर संस्थेच्या संवर्धन कार्यातील गडकिल्यांची छायाचित्रे प्रदर्शनातून शालेय आणि ग्रामीण भागात दाखवून जनजागगृती अभियानही राबविले आहे. तसेच गडकिल्यांच्या घेऱ्यातील दुर्लभ घटकांसाठी शैक्षिणक साहित्य, आरोग्य विषयक उपक्रम देखील राबविले आहेत. तर संस्थेने गडकोटांच्या घेऱ्यात गडमाहिती केंद्र आणि संग्रहालय माध्यमातून जनजागृती केली आहे, अशी माहिती या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष हासुरकर यांनी दिली आहे.

  संस्थेकडून संवर्धन कार्य सुरु असणारे गडकोट 

  1. किल्ले सामानगड जिल्हा कोल्हापूर 2. किल्ले मानगड - जिल्हा रायगड 3. किल्ले सुरगड - जिल्हा रायगड 4. किल्ले मृगगड - जिल्हा रायगड 5. किल्ले कलानिधीगड जिल्हा कोल्हापूर 6. किल्ले रामगड जिल्हा सिंधुदुर्ग 7. किल्ले सडा - बेळगाव 8. किल्ले वलभगड - बेळगाव 9. किल्ले महिमतगड जिल्हा रत्नागिरी 10. किल्ले महिपतगड जिल्हा रत्नागिरी 11. किल्ले मुल्हेर - जिल्हा नाशिक

  77 व्या वर्षी शिवज्योत घेऊन धावणाऱ्या आजी, 40 पेक्षा जास्त किल्ले केले सर, Video

  संवर्धन कार्यातील उल्लेखनीय कामगिरी

  1. किल्ले मानगडावरील 2012 साली गुप्त दरवाजा शोधमोहीम पूर्ण. 2. किल्ले सामानगडावरील मातीखालील नुप्त असलेला पूर्वाभिमुख 11 फूट दरवाजा 2018 साली उत्खननातून मोकळा. 3. रायगड येथील सांदोशी गावातील इतिहास प्रसिद्ध कावळ्या बावल्या खिंडीतील वीरगळ संशोधन व संवर्धन कार्य 2011. 4. कसबा संगमेश्वर येथील पुरातन मंदिरांची स्वछता व जनजागृती. 5. कलानिधी गडावरील तटबंदी पुनर्बांधणी. 6. मानगड पायथ्याशी मानगड कलादालन

  सन्मान व पुरस्कार

  1. सहयाद्री मित्र सन्मानचिन्ह - 2013 2. रोटरी क्लब पुणे - 2010 3. स्नेहानुकर सन्मान चिन्ह -2013 4. गिरिमित्र सम्मेलन - शरद वोहळेकर विशेष सन्मान - 2015 5. राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ शिवसंत पुरस्कार - 2016 6. युवा सेना युवा गौरव पुरस्कार - 2016 7. मराठी रत्न पुरस्कार, मुंबई - 2016 8. स्वराज्य संरक्षक सन्मान, पुणे - 2020 9. स्वच्छता अभियान सन्मान पुरात्तव विभाग - 2017 10. महाराष्ट्र शासन सन्मानपत्र - 2022 11. दुर्गपरिषद दुर्ग सन्मान - 2019 12. महसूल प्रशासन प्रशस्तिपत्रक - 2020 13. पराक्रमी मराठे सन्मान - पुणे 14. सन्मानपत्र - छत्रपती संभाजीराजे भोसले सन्मान व सन्मानचिन्ह 15. "बघतोस काय मुजरा कर " या बहुचर्चित मराठी सिनेमात दुर्गवीर संस्थेच्या संवर्धन कार्याचा छायाचित्रे द्वारे विशेष उल्लेख.

  लहानपणीचा सुविचार लेखनाचा छंद कसा बनला समाज परिवर्तन घडवणारा उपक्रम, पाहा Video

  विशेष गौरव 

  या अशा अनेक पुरस्कार व सत्कारांच्या माध्यमातुन तसेच विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्याचा विशेष मुलाखातींतून संतोष यांचा विशेष गौरव करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांची महाराष्ट्र गडसंवर्धन समितीवर पुणे विभागीय पदी नेमणूक देखील करण्यात आली आहे.

  First published:
  top videos

   Tags: Kolhapur, Local18