जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 77 व्या वर्षी शिवज्योत घेऊन धावणाऱ्या आजी, 40 पेक्षा जास्त किल्ले केले सर, Video

77 व्या वर्षी शिवज्योत घेऊन धावणाऱ्या आजी, 40 पेक्षा जास्त किल्ले केले सर, Video

77 व्या वर्षी शिवज्योत घेऊन धावणाऱ्या आजी, 40 पेक्षा जास्त किल्ले केले सर, Video

Kolhapur News : वय वर्ष 77 असताना देखील छत्रपती शिवरायांच्या सर्व गडकिल्ल्यांची भ्रमंती करण्याचा ध्यास आजींनी घेतलाय.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 01 मार्च :  कोल्हापूर हा एक रणरागिणींचा देखील जिल्हा असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. नुकताच शिवजयंतीचा सोहळा अवघ्या कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. याच शिवजयंतीच्या दिवशीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. कोल्हापुरात एक वृद्ध आजी हाती शिवज्योत घेऊन धावत असतानाचा हा व्हिडीओ आहे. कोल्हापूरच्या कळंबा परिसरात राहणाऱ्या आऊबाई पाटील या सेंट्रींग कंत्राटदार म्हणून काम करणाऱ्या दत्तात्रय पाटील यांच्या आई आहेत. यांचं वय 77 वर्षे आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतच्या कोणत्याही गोष्टीत त्या अगदी तरुण बनतात. घरातील शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन असो, आजूबाजूला बारशाच्या कार्यक्रमात शिवरायांचा पाळणा म्हणण्यापासून ते अनेक गडकिल्ले कोणाच्याही सहाऱ्याविना सर करत तिथे शिवरायांच्या पोवाड्यांचे गायन करण्यापर्यंत प्रत्येक वेळी आऊबाईंच्या अंगात एक वेगळाच सळसळता उत्साह पाहायला मिळतो.

    News18लोकमत
    News18लोकमत

    शिवजयंतीनिमित्त धावल्या आऊबाई त्यांच्या याच शिवरायांबद्दलच्या आदरयुक्त प्रेमापोटी त्यांनी शिवजयंतीच्या दिवशी शिवज्योत घेऊन धावण्याचे ठरवले. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी त्यांच्या घराजवळील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पन्हाळगडावरून शिवज्योत आणली होती. तिथून शिवरायांचा जय जयकार करून आऊबाई आणि सर्व कार्यकर्ते निघाले. पुढे आऊबाई यांनी कोल्हापूरच्या कळंबा आयटीआय पासून त्यांच्या घरापर्यंत हाती शिवज्योत घेऊन धावत हे अंतर पार केले होते. अनेक गडकिल्ले केलेत सर वय वर्ष 77 असताना देखील छत्रपती शिवरायांच्या सर्व गडकिल्ल्यांची भ्रमंती करण्याचा ध्यास आऊबाईंनी घेतलाय. खरतर 2007 सालापासून घरातील सर्व मंडळींच्या बरोबर त्या गडकिल्ल्यांवर जात आहेत. आजवर त्यांनी रायगड, प्रतापगड, सज्जनगड, तोरणा, पुरंदर, अजिंक्यतारा, नळदुर्ग, वसंतगड, जंजिरा, रत्नदुर्ग असे जवळजवळ 40 पेक्षा जास्त गडकिल्ले त्यांनी सर केले आहेत. दुर्गराज रायगड किल्ल्यावर तर 3 ते 4 वेळा जाऊन आल्याचे आऊबाई सांगतात.

    Shiv Jayanti 2023 : शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा, राजर्षी शाहूंची होती संकल्पना, पाहा Video

     एवढ्या जास्त वयातही होत नाही त्रास या वयात बऱ्याचदा वृद्धांमध्ये शारीरिक व्याधी निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. चालताना सांधे दुखणे, अंग दुखणे अशा प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागते. पण आऊबाईंना कोणत्या दुखण्याचा त्रास नाहीये तर कोणताही गड सर करताना देखील त्या कधीच थकत नाहीत. गडकिल्ल्यांवर चढताना शिवरायांमुळेच अंगात ताकद येते. त्यामुळे आपण कधी गड चढलो आणि कधी उतरलो, हे समजत देखील नाही, अशी भावना आऊबाई व्यक्त करतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात