ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर 12 जुलै : प्रसिद्ध नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात (Datta Temple) आज पहाटे दक्षिण द्वार सोहळा झाला. कृष्णा नदीचे पाणी जणू दत्त दर्शनासाठीच आलं होतं आणि याचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या पाण्यात पवित्र स्नानाचा आनंद भाविकांनी लुटला. नेमका हा सोहळा काय असतो हे या बातमीमधून जाणून घेऊया. Weather Update : पुणे, कोल्हापूरसह या जिल्ह्यांना पुढील 2 दिवस रेट अलर्ट; मुंबईमध्ये कशी असेल पावसाची स्थिती? कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर नरसोबावाडी इथलं दत्त मंदिर आहे. या मंदिरात कृष्णा नदीला पूर (Krishna River Flood) आल्यानंतर पाणी शिरतं. मात्र हे पाणी ज्यावेळी मंदिरातील दत्ताच्या पादुकांना लागतं, त्यावेळी मात्र त्याचं विशेष महत्त्व असतं. या मंदिराच्या रचनेनुसार उत्तर - दक्षिण वाहिनी असलेल्या कृष्णा नदीचे पाणी उत्तर दरवाज्यातून आत शिरते आणि दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडते. त्याला दक्षिणद्वार सोहळा म्हटलं जातं.
कोल्हापूर : नृसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळा; भाविकांनी लुटला स्नानाचा आनंद pic.twitter.com/OqX0Sd6iyI
— News18Lokmat (@News18lokmat) July 12, 2022
हा सोहळा अनुभवण्यासाठी आणि यामध्ये स्नान करण्यासाठी भविकांची मोठी गर्दी होते. आज पहाटे हा सोहळा झाल्याची माहिती मिळताच भाविकानी इथल्या स्नानाचा आंनद लुटला. गुरुपौर्णिमेच्या आधी हा सोहळा संपन्न होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पन्हाळा गड ढासळतोय…, ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची भीती दत्त महाराजांच्या अनेक तीर्थ क्षेत्रापैकी वाडीच्या या तीर्थक्षेत्राचं मोठं महत्त्व भाविकांमध्ये आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या मंदिरात येतात. मात्र ज्यावेळी पूरस्थिती निर्माण होते त्याचवेळी हा सोहळा अनुभवण्यास मिळतो. त्यामुळे हा दक्षिणद्वार सोहळा भाविकांना विशेष अनुभती देणारा ठरतो.