Weather Update : पुणे, कोल्हापूरसह या जिल्ह्यांना पुढील 2 दिवस रेट अलर्ट; मुंबईमध्ये कशी असेल पावसाची स्थिती?
Weather Update : पुणे, कोल्हापूरसह या जिल्ह्यांना पुढील 2 दिवस रेट अलर्ट; मुंबईमध्ये कशी असेल पावसाची स्थिती?
आता पुणे, कोल्हापूर, पालघर, नाशिक आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे (Red Alert Issued in Maharashtra). 14 जुलैपर्यंत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे (Heavy Rains till July 14).
पुणे 12 जुलै : राज्यभरात सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे नद्या, नाल्यांना पूरही आला आहे. आता पुणे, कोल्हापूर, पालघर, नाशिक आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे (Red Alert Issued in Maharashtra). 14 जुलैपर्यंत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे (Heavy Rains till July 14). त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयएमडीने याबाबतची माहिती दिली आहे.
BREAKING : नाशिकमध्ये रेड अलर्ट; ग्रामीण भागात पहिली ते बारावीपर्यंत सुट्टी जाहीर
याशिवाय मुंबईमध्येही पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कायम राहील. मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामानाच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे या भागात संपूर्ण काळजी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच शक्य असल्यास अशा भागांमधून प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
Maharashtra | A red alert has been issued for Kolhapur, Palghar, Nashik, Pune, and Ratnagiri districts for heavy rains till July 14. An orange alert has been issued for Mumbai for the next 3 days: IMD
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस -
दरम्यान नाशिकमध्ये अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे. याशिवाय धोक्याच्या ठिकाणी असलेल्यांनी तातडीने प्रशासनाशीसंपर्क करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असंही सांगण्यात आलं आहे.
Weather Update : मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट; पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
सध्या राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. (Heavy Rain in Maharashtra) मुसळधार पावसाने अनेक जणांचा मृत्यू (Death Due to Rain) झाला आहे. तर काही ठिकाणी प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे. अशात आता पुढचे 3 ते 4 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.