जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चावरेत कोरे-महाडिक गटाला यश; चावरे ग्रामविकास आघाडीपुढे विरोधक भुईसपाट

चावरेत कोरे-महाडिक गटाला यश; चावरे ग्रामविकास आघाडीपुढे विरोधक भुईसपाट

चावरे ग्रामपंचायत निवडणूक

चावरे ग्रामपंचायत निवडणूक

लोकनियुक्त सरपंच पदी उदय सर्जेराव पाटील 801 मतांनी विजयी झाले. निवडणूक निकाल हाती येताच चावरे ग्रामविकास आघाडीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 20 डिसेंबर : हातकणंगले तालुक्यातील चावरे गावात कोरे-महाडिक गटाच्या चावरे ग्रामविकास आघाडीचे 11 सदस्य आणि सरपंच अशा सर्व 12 जागा विजयी झाल्या. लोकनियुक्त सरपंच पदी उदय सर्जेराव पाटील 801 मतांनी विजयी झाले. निवडणूक निकाल हाती येताच चावरे ग्रामविकास आघाडीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी चावरे गावात पारंपरिक आघाड्या रिंगणात होत्या. कोरे महाडिक गटाचे उदय पाटील आणि बाळकृष्ण बोराडे यांची चावरे ग्रामविकास आघाडी आणि बंटी पाटील-राजू शेट्टी-कोरे या गटाचे जगन्नाथ पाटील आणि माणिक चौगले यांच्या जनसेवा विकास आघाडीमध्ये लढत होती. मात्र, सरपंच पदासह सर्व 11 जागांवर कोरे-महाडिक गटाचा दणदणीत विजय झाला. लोकनियुक्त सपरंच पदी उदय पाटील 1798 मते मिळवून विजयी झाले. प्रतिस्पर्धी जगन्नाथ पाटील यांना 997 मते मिळाली. तर अपक्ष नवनाथ पाटीलने 216 मते मिळवली. गावात सरासरी 85 टक्के मतदान झाल्याने कौल कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. सकाळपासूनच निकालाकडे समर्थकांचे लक्ष लागून होते. निवडणुकीपूर्वी बांधलेले अनेक तर्कवितर्क खोटे ठरवत चावरे ग्रामविकास आघाडीचे 11 सदस्य + सरपंच असे सर्व उमेदवार विजयी झाले. हे वाचा -  अंबाबाई मंदिरात दर शुक्रवारी होणारा कुंकूमार्चन सोहळा काय आहे? पाहा Video विजयी उमेदवार आणि मिळालेली मते - लोकनियुक्त सरपंच - उदय पाटील - 1798 नवनिर्वाचित सदस्य - अमर शिंदे - 571 मकरंद बोराडे - 514 आक्काताई धनवडे - 554 संजीवनी पाटील - 503 धनाजी घोडके - 324 शैलजा निकम -282 सुजाता गुरव - 500 सुनंदा पाटील - 499 कृष्णात कांबळे - 506 रामचंद्र पाटील - 428 रुपाली हारुगडे - 499

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात