मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्यानं बोलावलं अन्..; कोल्हापुरात CAकडून महिलेवर बलात्कार

कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्यानं बोलावलं अन्..; कोल्हापुरात CAकडून महिलेवर बलात्कार

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Rape in Sangli: कर्ज प्रकरणाचं काम पूर्ण करून देतो (lure of loan sanction) म्हणत एका सीएने महिलेशी जबरदस्ती शारीरिक संबंध (CA raped woman) ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सांगली, 11 डिसेंबर: कर्ज प्रकरणाचं काम पूर्ण करून देतो (lure of loan sanction), म्हणत एका सीएने महिलेशी जबरदस्ती शारीरिक संबंध (CA raped woman) ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिला घटस्फोटीत असून तिला दोन मुलं आहेत. पीडित महिलेच्या निराधारपणाचा फायदा घेत आरोपी सीएने तिच्यावर अनेकदा बलात्कार दिला आहे. आरोपीनं तब्बल सहा वर्षे पीडितेचं लैंगिक शोषण (raped for 6 years) केलं आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

चंद्रकांत चौगुले असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. आरोपी चौगुले हा सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातील सिल्व्हर ओक अपार्टमेंटमधील रहिवासी आहे. तर पीडित महिला ही घटस्फोटित असून ती आपल्या दोन मुलांसह आईसोबत कोल्हापूर येथे राहते. पती सांभाळत नसल्याने पीडित महिलेनं 2012 साली घटस्फोट घेतला होता. पतीपासून वेगळं झाल्यानंतर, त्यांना इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांना काही पैशांची आवश्यकता होती.

हेही वाचा-बड्या राजकीय नेत्याकडून तरुणीचं आयुष्य उद्धवस्त, लग्नानंतरही देत राहिला नरकयातना

त्यामुळे पीडित महिलेच्या एका परिचिताने सांगलीतील सीए चंद्रकांत चौगुले यांचा सल्ला घेण्यास सांगितलं. त्यामुळे पीडितेनं चौगुलेशी संपर्क साधला असता, त्याने कागदपत्रे घेऊन पीडितेला सांगलीला बोलावलं. यानंतर आरोपी विविध कारणं देऊन पीडितेला वारंवार सांगलीला बोलावू लागला. दरम्यान एकेदिवशी आरोपीनं पीडितेला घरी बोलावलं. यावेळी घरी कोणीचं नव्हतं. याची संधी साधत आरोपीनं पीडितेवर प्रेम असल्याचं सांगत लग्नासाठी मागणी घातली. पण पीडितेनं लग्नास नकार दिला. महिलेनं नकार देताच आरोपीनं पीडितेवर जबरदस्ती करत अत्याचार केला.

हेही वाचा-मधुचंद्र होताच नवऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, उध्वस्त झालं नववधूचं आयुष्य

या घटनेनंतर आरोपीनं 2012 ते 2018 या कालावधीत पीडितेला बदनाम करण्याची धमकी देत अनेकदा अत्याचार केला आहे. पीडित महिलेनं 2018 साली आरोपीसोबत संबंध तोडल्यानंतर देखील त्याचा त्रास सुरूच राहिला. संबंध तोडल्यानंतर आरोपीनं लैंगिक संबंधाची माहिती पीडितेच्या पतीला देखील दिली आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Rape, Sangli