मराठी बातम्या /बातम्या /देश /मधुचंद्रानंतर दुसऱ्याच दिवशी नवऱ्याची आत्महत्या; उद्धवस्त झालं नववधूचं आयुष्य

मधुचंद्रानंतर दुसऱ्याच दिवशी नवऱ्याची आत्महत्या; उद्धवस्त झालं नववधूचं आयुष्य

जिथे लग्नाच्या पहिल्याच (first night of the wedding) रात्रीच नववधूचं आयुष्य उध्वस्त झालं.

जिथे लग्नाच्या पहिल्याच (first night of the wedding) रात्रीच नववधूचं आयुष्य उध्वस्त झालं.

जिथे लग्नाच्या पहिल्याच (first night of the wedding) रात्रीच नववधूचं आयुष्य उध्वस्त झालं.

पश्चिम बंगाल, 11 डिसेंबर: पश्चिम (West Bengal) बंगालमधील (shocking incident) हावडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे लग्नाच्या पहिल्याच (first night of the wedding) रात्रीच नववधूचं आयुष्य उध्वस्त झालं. सकाळी नवरा फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर एकच खळबळ पसरली.

हे प्रकरण बी गार्डन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या शालीमार भागातील आहे. या घटनेनंतर कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. सध्या या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न कुटुंबीय आणि पोलीस करत आहेत. अखेर नवीनच लग्न झालेल्या तरुणानं आत्महत्येचं पाऊल का उचललं या मागाचा तपास पोलीस करत आहेत.

मधुचंद्रच्या रात्रीच वरानं केली आत्महत्या

प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. , पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल. सध्या तरी वराच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. कुटुंबासोबतच वधूही विचार करत आहे की, मधुचंद्रच्या रात्री असं काय घडलं, ज्यामुळे वरानं आपले जीवन संपवलं. यावरून पोलीस कुटुंबीयांची चौकशीही करत आहेत.

हेही वाचा- चिंता वाढवणारी बातमी, Omicron चे सर्वाधिक रुग्ण आपल्याच राज्यात

7 डिसेंबर रोजी शालीमार येथे राहणाऱ्या आदर्श साओ (24) याने बराकपूर येथील एका मुलीसोबत थाटामाटात लग्न केलं होतं. शालिमार ते बराकपूर 150 लोकं वरातीत सहभागी झाले होते. हे लग्न दोघांच्या संमतीनं लग्न झाल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

8 डिसेंबर रोजी नववधू सासरच्या घरी आली. गुरुवारी मधुचंद्र आणि शुक्रवारी रात्री बहू-भात (सूनेची ओळख करुन देण्याचा कार्यक्रम) होतं. शुक्रवारी सकाळी दोघांनाही जाग आली. पतीनं नववधूला अंघोळ करण्यास सांगितलं. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर ती अंघोळ करून परत खोलीत आली असता तिचा नवरा फासावर लटकत असल्याचं तिला दिसले. हे पाहून घरात एकच आरडाओरडा झाला.

फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसला नवरा

घरातल्यांनी नवऱ्याला तात्काळ खाली उतरवलं आणि ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वधूनं सांगितलं की, लग्न ठरल्यानंतर दोघंही गेल्या सहा महिन्यांपासून संपर्कात होते आणि रोज फोनवर बोलत होते. आम्ही दोघंही लग्नाची आतुरतेनं वाट पाहत होतो. सगळं व्यवस्थित चाललं होतं. शुक्रवारी सकाळी त्याने मला अंघोळीसाठी पाठवलं. अर्ध्या तासानंतर मी खोलीत आली तेव्हा त्यानं शॉलनं फास घेतला होता. माझा संसार सुरु होण्याआधीच माझं आयुष्य उध्वस्त झालं आहे. मला आता काहीच समजत नाही आहे.

पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत

त्याचवेळी या घटनेबाबत पोलिसांचं म्हणणे आहे की, या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यात येत आहे. लवकरच या घटनेचा छडा लावला जाईल. शेजारी आणि नातेवाईकांची चौकशी केली जात असून पोस्टमार्टमनंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सोपवण्यात येईल. अनेक बाबी लक्षात घेऊन पोलीस तपास करत आहेत.

First published:

Tags: West bengal