मराठी बातम्या /बातम्या /देश /बड्या राजकीय नेत्याकडून तरुणीचं आयुष्य उद्धवस्त, लग्नानंतरही देत राहिला नरक यातना; 4 वर्षांपासून सुरू होता भयावह प्रकार

बड्या राजकीय नेत्याकडून तरुणीचं आयुष्य उद्धवस्त, लग्नानंतरही देत राहिला नरक यातना; 4 वर्षांपासून सुरू होता भयावह प्रकार

Crime News: एका बड्या राजकीय नेत्यानं एका तरुणीवर वारंवार बलात्कार (Political leader raped woman) केला आहे. आरोपीनं पीडित तरुणीचे अश्लील फोटो काढून (Clicked obscene photos) तिला लग्नानंतरही ब्लॅकमेल (Blackmail) केलं आहे.

Crime News: एका बड्या राजकीय नेत्यानं एका तरुणीवर वारंवार बलात्कार (Political leader raped woman) केला आहे. आरोपीनं पीडित तरुणीचे अश्लील फोटो काढून (Clicked obscene photos) तिला लग्नानंतरही ब्लॅकमेल (Blackmail) केलं आहे.

Crime News: एका बड्या राजकीय नेत्यानं एका तरुणीवर वारंवार बलात्कार (Political leader raped woman) केला आहे. आरोपीनं पीडित तरुणीचे अश्लील फोटो काढून (Clicked obscene photos) तिला लग्नानंतरही ब्लॅकमेल (Blackmail) केलं आहे.

नवी दिल्ली, 10 डिसेंबर: गेल्या काही दिवसांपासून देशात अल्पवयीन मुलींवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. दरम्यान राजकीय नेत्याने लैंगिक शोषण केल्याच्याही काही  घटना (Political leader raped young woman) उघडकीस आल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. एका बड्या राजकीय नेत्यानं एका तरुणीवर वारंवार बलात्कार केला आहे. आरोपीनं पीडित तरुणीचे अश्लील फोटो काढून (Clicked obscene photos) तिला लग्नानंतरही ब्लॅकमेल (Blackmail) केलं आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं पोलिसांनात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे.

संबंधित घटना हरियाणा (Haryana) राज्यातील हिसार (Hisar) येथील असून रमेश गोदरा (Ramesh Godra) असं संशयित आरोपीचं नाव आहे. आरोपी गोदरा हा हिसार येथील जननायक जनता पार्टीचा (Jananayaka Janta party) जिल्हाध्यक्ष आहे. आरोपीनं 2017 साली सर्वप्रथम चंदीगड येथील एमएलए हॉस्टेलवर नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला होता. यावेळी आरोपीनं पीडितेचे काही अश्लील फोटो देखील शूट केले होते. संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेवर अनेकदा लैंगिक अत्याचार केला आहे. दरम्यान पीडितेचं लग्न झालं तरीही आरोपीचा त्रास बंद झाला नाही.

हेही वाचा-संतापजनक! अल्पवयीन मुलीचे कपडे उतरवून मारहाण, नग्न व्हिडीओ काढला, मुंबईतील घटना

आरोपी पीडितेला वेळोवेळी तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचं लैंगिक शोषण करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 साली एकेदिवशी पीडित तरुणी आजारी होती. तेव्हा संशयित आरोपी रमेश गोदरा याने पीडितेला कालका येथील एका डॉक्टरकडे उपचार करण्याच्या बहाण्याने तिला चंदीगड येथे बोलावलं. चंदीगडला आल्यावर तो पीडितेला घेऊन एमएलएम हॉस्टेलमध्ये गेला. आता रात्र झाली आहे आपण उद्या सकाळी डॉक्टरांकडे जाऊ असं त्यानं पीडितेला सांगितलं. तसेच संधीचा फायदा घेत आरोपीनं तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.

हेही वाचा-नराधम! मेडिकल दुकानदाराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पीडितेनं सर्वप्रथम आदमपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या प्रयत्न केला होता. पण अत्याचाराची घटना चंदीगड याठिकाणी घडल्याचं सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आरोपीनं अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचं 4 वर्षे लैंगिक शोषण केलं आहे. यानंतर अखेर आदमपूर पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी रमेश गोदरा हा हिसार जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष असून त्याने 2019 मध्ये जननायक जनता पार्टीच्या तिकिटावर आदमपूर विधानसभेतून निवडणूक लढवली होती. पण तेथे त्याचा पराभव झाला होता.

First published:
top videos

    Tags: Crime news, Haryana, Rape