नागपूर, 28 जानेवारी : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरात गळफास लागून एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकारानं शहरात खळबळ उडाली आहे. नागपुरातील सोमवारी क्वार्टर परिसरात ही घटना घडली आहे. या मुलाचा मृत्यू नेमका कसा झाला, त्याला गळफास कसा लागला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र तो त्याच्या आईच्या मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप डाऊलोड करायचा, त्यामध्ये त्याने या पद्धतीचे काही व्हिडीओ पाहिले आणि त्यातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
घरी परतला नसल्यानं शोध
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित मुलाचा गळफास लागून मृत्यू झाला आहे. तो नागपुरातील सोमवारी क्वार्टर परिसरात आपल्या आई-वडिलांसोबत राहात होता. तो नेहमी त्यांचे शेजारी असलेल्या चिखले यांच्या घरातील छतावर जाऊन खेळत असे. मात्र बराचवेळ होऊनही तो परतला नसल्यानं घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता तो नायलॉनच्या ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. त्याला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु तोपर्यंत उशिर झाल्यानं डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केलं.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्यानं आई,वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नेहमीप्रमाणे तो खेळण्यासाठी गेला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो परतला नसल्यानं कुटुंबाकडून त्याचा शोध घेण्यात आला. शोध घेतला असता हा मुलगा नायलॉनच्या ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. आपल्या मुलाची ही अवस्था पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur, Nagpur News