मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Kolhapur : थंडीत माणुसकीची ऊब, 'त्या' मुलांनाही मिळणार स्वेटर्स

Kolhapur : थंडीत माणुसकीची ऊब, 'त्या' मुलांनाही मिळणार स्वेटर्स

कोल्हापुरातील अवनि संस्थेने उबदार स्वेटर्स आणि कपडे जमा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

कोल्हापुरातील अवनि संस्थेने उबदार स्वेटर्स आणि कपडे जमा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

कोल्हापुरातील अवनि संस्थेने उबदार स्वेटर्स आणि कपडे जमा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Kolhapur, India

    कोल्हापूर, 03 नोव्हेंबर : सध्या थंडीचा कडाका वाढत चालला आहे. सर्वांना थंडीपासून बचावासाठी शेकोटी, उबदार कपडे यांची मदत घेण्याची गरज भासू लागली आहे. सर्वजण घरामध्ये गरम वातावरण करून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. पण समाजातील इतर वंचित घटक ऊसतोड मजुर आणि त्यांची मुले, हे लोकं थंडीपासून बचाव करण्यासाठी जास्त काही करू शकत नाहीत. त्यामुळे अशा मुलांना मदत करण्यासाठी कोल्हापुरातील एका संस्थेने पुढाकार घेतला आहे.

    जिल्ह्यातील वीटभट्टी आणि साखर कारखान्यांवरील ऊसतोड कामगारांना त्यांच्या चिमुकल्यांना घेऊनच कामाच्या ठिकाणी जावे लागते. अशातच त्या लहान मुलांना आपुलकीची ऊब हवी आहे, याकरिता कोल्हापुरातील अवनि संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी या संस्थेमार्फत कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉलवर जुने नवीन कपडे, उबदार स्वेटर्स, ब्लँकेट, इ. गोष्टी जमा करून घेतल्या जात आहेत. या जमा करण्यात आलेल्या या सर्व गोष्टी जिल्ह्यातील वीटभट्टी आणि ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना देण्यात येणार आहेत, असे अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी सांगितले आहे.

    Kolhapur : व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तरुण करतायत रुग्णांची मदत, अनेकांचे वाचवले प्राण, Video

    लहान मुलांचे स्वेटर, ब्लॅंकेट जास्त हवेत 

    गेले काही दिवसांपासून हा उपक्रम कोल्हापुरात सुरू करण्यात आला आहे. तर यामध्ये लोकं सध्या भरपूर प्रमाणात कपडेच आणून देत आहेत. पण आपल्याला लहान मुलांचे स्वेटर, ब्लॅंकेट इ. वस्तू जास्त प्रमाणात हवे आहेत. स्वेटर, ब्लॅंकेट याला थोडा अल्प प्रतिसाद मिळत आहे, असे देखील संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर या उपक्रमाची बातमी समजल्या नंतर स्वेटरसाठी कॅनडा स्थित भारतीयांनी देखील अवनि संस्थेला मदत केली आहे. त्यांनी 600 स्वेटर मदत स्वरूपात दिले आहेत. त्याच सोबत इतर काही नागरिकांनी सुद्धा स्वेटर साठी मदत केली असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

    जमा करण्यात आलेल्या वस्तूंचे होणार वाटप 

    एकूण सुमारे 1500 बालकांना ऊबदार कपड्यांची गरज असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींना तसेच संस्था, संघटना व नागरिकांना आपुलकीचा हात पुढे करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे. हा संकलनाचा उपक्रम येत्या 6 डिसेंबर पर्यंत रोज दिवसभर सुरु असेल. त्यानंतर हे जमा करण्यात आलेल्या वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.

    Sangli : बेघरांसाठी मायेची 'सावली', शेकडो जणांना मिळाला आधार, पाहा Video

    या उपक्रमात सहभागी होऊन आपण ऊबदार कपडे, स्वेटर, ब्लॅंकेट अशा स्वरूपात वस्तू द्याव्यात. त्याचबरोबर स्वेटरसाठी देणगी स्वरूपात मदत जर कोणी देणार असतील, तर AVANI - 1 या नावे चेक दसरा चौक, जिवबानाना जाधव पार्क येथे देऊ शकता, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी केले आहे.

    कुठे जमा कराल मदत ?

    दसरा चौक येथे स्वेटर संकलन साठी प्रतिनिधी -इम्रान शेख - 8380864124 अवनि कार्यालय, जिवबाना जाधव पार्क येथील प्रतिनिधी - साताप्पा मोहिते - 7757091100 एकटी निवारा केंद्र प्रतिनिधी -अक्षय पाटील - 9309125508

    First published:

    Tags: Kolhapur, Local18