मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dog Show : माणसांनाही लाजवेल अशी शिस्त; सातारा अन् कोल्हापूरमध्ये होती चुरस, पाहा कुठला डॉग जिंकला?

Dog Show : माणसांनाही लाजवेल अशी शिस्त; सातारा अन् कोल्हापूरमध्ये होती चुरस, पाहा कुठला डॉग जिंकला?

X
Dog

Dog Show : श्वान प्रेमींसाठी एक पर्वणी ठरणारा डॉग शो कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये देशभरातील श्वान सहभागी झाले होते.

Dog Show : श्वान प्रेमींसाठी एक पर्वणी ठरणारा डॉग शो कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये देशभरातील श्वान सहभागी झाले होते.

  • Local18
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 16 जानेवारी : श्वान प्रेमींसाठी एक पर्वणी ठरणारा डॉग शो कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. या निमित्तानं विविध प्रजातींचे देशी आणि विदेशी श्वान एकाच ठिकाणी पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली. कोल्हापुरात 14 आणि 15 जानेवारी असा 2 दिवस हा डॉग शो पार पडला.

देशभरातील श्वान सहभागी

युनायटेड केनेल क्लब (इंडिया)कडून कोल्हापुरात नुकतीच केनेल असोसिएशन, कोल्हापूर या क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या असोसिएशनच्या माध्यमातून हा डॉग शो आयोजित करण्यात आला होता. या क्लबच्या माध्यमातून होणारा महाराष्ट्रातील हा पहिलाच डॉग शो होता. कोल्हापुरातील खराडे कॉलेजच्या मैदानावर हा डॉग शो झाला. कोरोनानंतर तीन वर्षांनी असा डॉग शो पार पडल्याने श्वान प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

या डॉग शो मध्ये देशभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. कोल्हापूरसह मुंबई, पुणे, हैदराबाद, कर्नाटकातील बागलकोट, विजापूर, बेळगाव, हुबळी, धारवाड अशा अनेक ठिकणांहून हे श्वान दाखल झाले होते. त्यामुळे अनेक जातिवंत श्वान पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना एकाच ठिकाणी मिळाली. या डॉग शो मध्ये जर्मन शेफर्ड, रॉटविलर, गोल्डन रिट्रीवर, डॉबरमॅन, लाब्राडोर, सायबेरियन हस्की यासारख्या लोकप्रिय ब्रिड बरोबरच फॉक्स टेरियर, सायमनौड, ब्रिटिश बुलडॉग, पशमी, व्हिपेट यासारख्या दुर्मिळ जातीच्या श्वानांची स्पर्धेतील उपस्थिती प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत होती. अशी माहिती केनेल असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष सागर पाटील यांनी दिली आहे.

यावर्षी किल्लारीसारखी नैसर्गिक आपत्ती? भाकणुकीतील धक्कादायक अंदाज, Video

कुणी मारली बाजी?

या स्पर्धेत सातारा येथील संग्राम शिंदे यांच्या रॉटविलर जातीच्या श्वानाने आणि कोल्हापूरच्या ऐश्वर्या माणगावे यांच्या डॉबरमॅन जातीच्या श्वानाने बेस्ट इन शो चा किताब पटकावला. सातारा येथील संदीप तोडकर यांच्या ग्रेट डेन जातीच्या श्वानाने बेस्ट पप्पी इन शोचा किताब पटकावला. तर कोल्हापूरच्या सुमित माणगावे यांना बेस्ट हँडलर या किताबाने सन्मानित करण्यात आले.

या दोन दिवसांच्या डॉग शोमध्ये 14 जानेवारीला रॉटविलर आणि लॅब्राडोर या प्रजातीच्या स्पेशालिटीची स्पर्धा पार पडली. या दोन्ही स्पेशालिटी साठी जवळपास 80 श्वान सहभागी झाले होते. तर, 15 जानेवारीला सर्व प्रजातींच्या श्वानांसाठी शो पार पडला. यामध्ये तब्बल 182 श्वानांनी सहभाग घेतला होता.यामध्ये बेस्ट डॉग हॅण्डलर, चाईल्ड डॉग हॅण्डलर गटांसाठी पुरस्कार देण्यात आले.

या प्रकारच्या स्पर्धेत पाठविले जाणाऱ्या श्वानांचे पालनपोषण त्यांच्या मालकांकडून अत्यंत चांगल्या पद्धतीने केले जात असते. या श्वानांसाठी अनेक गोष्टी देखील या डॉग शोच्या निमित्तानं विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. इथं आलेल्या विविध स्टॉलमध्ये श्वानांसाठी लागणाऱ्या विविध वस्तू, बेल्ट्स, त्यांचे खाद्यपदार्थ घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

First published:

Tags: Dog, Kolhapur, Local18