जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बसमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला व्यक्ती; बॅगमधील सामान पाहून पोलिसांनाही बसला धक्का

बसमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला व्यक्ती; बॅगमधील सामान पाहून पोलिसांनाही बसला धक्का

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

हा व्यक्ती बसमध्येच जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या गळ्यावर वार होते आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सहप्रवाशांनी लगेचच या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 01 डिसेंबर : घाटकोपर हून उदयपूरला जाणाऱ्या एका खासगी बसमध्येच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. महत्त्वाची बाब म्हणजे या व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं दिसून आलं. त्यामुळे ही हत्या असल्याचा अंदाज लावला जात होता. मात्र, आता या व्यक्तीकडील बॅगमध्ये आढळलेल्या सामानावरुन ही आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रेयसीने गर्भवती असल्याचं सांगताच तरुणाला बसला धक्का, सेल्फी पाठवून घडलं भयंकर! घाटकोपरहून उदयपूरला जाणाऱ्या खासगी बसमध्ये एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला होता. मृत व्यक्ती हा मध्य प्रदेशातील जबलपूर येथील होता. ही व्यक्ती बसने घाटकोपरहून उदयपूरला प्रवास करत होता. मात्र, रस्त्यात ही बस खानपानासाठी थांबली. यावेळी बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती सहप्रवाशांनी दिली आहे. हा व्यक्ती बसमध्येच जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या गळ्यावर वार होते आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सहप्रवाशांनी लगेचच या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचाराआधीच या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा व्यक्ती घोडबंदर येथून बसमध्ये चढला होता. तर हा संपूर्ण प्रकार चारोटी नाक्याजवळ घडला. ही घटना घडली तेव्हा इतर प्रवाशी खानपानासाठी उतरले होते. तिच्यामुळे जेलमध्ये गेला अन् जामिनावर बाहेर येताच तिलाच घेऊन पळून गेला याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली. यानंतर पंचनामा करण्यात आला. यात रामनाथ यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळले. पोलिसांनी रामनाथ यांची बॅग तपासली असता त्यात बॅलेडचा मोठा साठा आढळला आहे. त्यामुळे ही आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणाच्या तपासात बराच वेळ गेला. यावेळी पोलिसांनी इतर प्रवाशांच्या जेवणाची आणि नाश्त्याची सोयही केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात