कोल्हापूर, 22 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत शिवसेनेच्या 12 खासदारांनी बंडखोरी केली. दरम्यान या 12 खासदारांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही शिवसनेचे खासदार शिंदे गटात गेल्याने कोल्हापूर जिल्ह्यात आगामी निवडणुकांमध्ये खासदार कोण ही चर्चा रंगली आहे. खासदार संजय मंडलीक आणि खासदार धैर्यशिल माने यांनी केलेल्या बंडखोरीने जिल्ह्यातील राजकारण नव्या वळणावर आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना फोन करून लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. (Kolhapur Sharad Pawar)
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार शिवसेनेचे असल्याने त्यांनी महाविकास आघाडीतून फारकत घेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. दरम्यान कोल्हापूर हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोन्ही मतदार संघावर नजर ठेवून असणार आहेत. यासाठी ते आतापासूनच कामाला लागल्याचे दिसून येत आहे. यासाठी शरद पवारांनी थेट हसन मुश्रीफ यांना फोन करत तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा 200 मतांचा दावा फोल! राष्ट्रपती निवडणुकीत राज्यातून मुर्मूंना किती मतं?
लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याला नवीन उमेदवारांची तयारी केली पहिजे. त्यासाठी आता आपण लक्ष घालावे, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांना फोवरून दिल्या आहेत. दरम्यान, लोकसभेची निवडणूक लढविण्याची आपली इच्छा नाही; परंतु पक्षाने आदेश दिल्यास तो आपण नाकारू शकत नाही, असे मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवसेनेत 40 आमदारांना बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले यानंतर मागच्या चार दिवसांपूर्वी 12 खासदारही शिवसेनेसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटासोबत गेल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात राजकीय समिकरणे बदलली आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नाव सर्वात पुढे आले आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदार फुटल्याने शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभुमीवर बदललेल्या राजकीय परिस्थितीबाबत शरद पवार प्रत्येक जिल्ह्यातील नेत्यांशी संपर्क साधून जिल्ह्यातील माहिती घेत आहेत. खचून न जाता कामाला लागण्याच्या सूचना देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते मुश्रीफ यांनाही पवार यांचा फोन आला होता.
हे ही वाचा : 'माझं काय चुकलं?'; आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बंडखोर आमदार सांगणार शिवसेनेचे हे चुकलेले निर्णय
जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती समजून घेतल्यानंतर पवार म्हणाले, जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही खासदार शिंदे गटात गेले आहेत. सन 2019 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार धनंजय महाडिक हे देखील भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे नव्या उमेदवारांची तयारी आपल्याला करावी लागेल. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत. खा. संजय मंडलिक हे शिंदे गटात गेल्यामुळे लोकसभेचे उमेदवार म्हणून आ. मुश्रीफ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईसोडून दिल्लीला जाण्याची इच्छा नाही
लोकभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला फार रस नाही. अजून एक विधानसभेची निवडणूक लढविण्याची आपली इच्छा आहे. असे असले तरी पक्षाच्या नेत्यांनी आदेश दिल्यास त्याचे मला पालन करावे लागेल, असे मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, NCP, Sanjay mandlik, Sharad Pawar (Politician), Shiv Sena (Political Party)