मुंबई, 29 मार्च : कोरोनामुळे जगभरात भीती निर्माण झाली आहे. चीनमधून जगातील अनेक देशांत पसरलेल्या या व्हायरसनं संकट ओढावलं आहे. या संकटाच्या काळात माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या घटना घडत आहेत. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरच्या एका तरुणाने विमान प्रवासावेळी प्रसंगावधान राखत प्रथमोपचार केले. कॅनडातून भारतात येत असताना रमाकांत रावसाहेब पाटील या तरुणाने केलेल्या या सेवेसाठी विमान कंपनीने त्याला बक्षीसही दिलं. जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अनेकांनी आपआपल्या देशात परतण्यास सुरुवात केली. कॅनडातून विमानाने येत असताना एका गरोदर महिलेच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. त्यावेळी विमानात अनाउन्समेंट झाली की, वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित कोणी प्रवास करत आहे का? तेव्हा विमानात असलेला कोल्हापूरचा रमाकांत रावसाहेब पाटली हा तरुण पुढे झाला. त्यानं विमानातील क्रू मेंबर्ससह संबंधित महिलेवर प्रथमोपचार केले. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. कॅनडातील हॉस्पिटलमध्ये हेल्थकेअर असिस्टंट म्हणून रमाकांत रावसाहेब पाटील काम करतो. तो भारतात येत असताना कॅनडा ते नेदरलँड आणि नेदरलँड ते भार असा प्रवास केला. त्यावेळी कॅनडा ते नेदरलँड प्रवासावेळी लोकांची तारांबळ उडाली होती. तेव्हा त्याच विमानातून एक भारतीय गरोदर महिलाही प्रवास करत होती. विमानाचे उड्डाण होताच महिलेच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. विमानातील क्रू मेंबर्सनी तिच्यावर प्रथमोपचाराचे प्रयत्न केले. हे वाचा : लॉकडाऊनमध्ये सलमान खानसंदर्भात मोठी बातमी, 25,000 रोजंदार कामगारांना मदतीचा हात महिलेवर उपचारासाठी विमानात कोणी वैद्यकीय क्षेत्रात काम करणारं आहे का यासाठी विचारणाही करण्यात आली. तेव्हा रमाकांत पाटील हा तरुण पुढे आला. त्यानं नर्सिंग क्षेत्रातील त्याच्या अनुभवाच्या जोरावर महिलेवर उपचार केले. विमानाच्या दोन तासांच्या प्रवासात महिलेची प्रकृती स्थिर ठेवण्याचं काम त्यानं केलं. नेदरलँडमध्ये विमान उतरल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात पुढचे उपचार झाले. हे वाचा : कोरोनाच्या लढ्यात त्याची मोदींना 501 रु.ची मदत, पंतप्रधानांनकडून कौतुकाची थाप रमाकांतने केलेल्या या सेवेबद्दल विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनीही त्याचं कौतुक केलं. याबद्दल नेदरलँड विमान कंपनीनं त्याला बक्षीसही जाहीर केलं. रमाकांत प्रमाणेच सध्याच्या या कठीण काळात अनेक लोक आपआपल्यापरीने लोकांना मदत करत असतात. यांचे काम इतरांसाठी प्रेरणादायी असंच आहे. जगभर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात डॉक्टर आणि नर्स आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. हे वाचा : मुस्लिमांनी ‘राम नाम’ जप करीत केला अंत्यसंस्कार, दु:खात माणुसकी धावून आली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.