लॉकडाऊनमध्ये सलमान खानसंदर्भात मोठी बातमी, तब्बल 25,000 रोजंदार कामगारांना करणार मदत

सलमान खानपूर्वी अक्षय कुमार याने तब्बल 25 कोटींची मदत जाहीर केली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मार्च : अभिनेता सलमान खान (Salman Khan) नेहमी विविध पद्धतीने गरजूंची मदत करीत असतो. त्याच्या Being Human या संस्थेच्या माध्यमातून देशातील अनेक गरजूंना दान करण्यात आलं आहे. सध्या कोरोनाच्या (Coronavirus) विळख्यात देश अडकला असताना अनेक मदतीचे हात सोबत आले आहेत. आतापर्यंत अभिनेता अक्षय कुमार याने 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय अनेक उद्योगपतीही पुढे आले आहे.

कोरोनाचा (Covid - 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे  हाल होत आहे. देशभरात लॉकडाऊन (Lockdown) असल्याने हाताला काम नाही. त्यामुळे आता घर कसं चालवायंच असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे. यात अभिनेता सलमान खान या कामगारांच्या मदतीला धावून आला आहे.

संबंधित - कोरोनाच्या लढ्यात त्याची मोदींना 501 रु.ची मदत, पंतप्रधानांनकडून कौतुकाची थाप

सलमान खान तब्बल 25,000 रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मदत करणार आहे. चित्रपटाचं शूटिंग बंद झाल्यामुळे सेटवर काम करणारे, सफाई करणारे, स्वयंपाकाच काम करणाऱ्या कामगारांच्या हाताला काम नाही. यापूर्वी फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्लॉई संस्थेने कलाकार व निर्मात्यांना मदतीचं आवाहन केलं आहे. सिनेष्टीतील या कामगारांचे हाल होऊ नये यासाठी सलमान खान fwice या संस्थेच्या संपर्कात आहेत. या संस्थेच्या मदतीने सलमानची टीम रोजंदारीवर काम करणाऱ्या मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

यापूर्वी देखील सलमानने सिनेसृष्टीत रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या शिक्षण व वैद्यकीय खर्च केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या या कठीण काळातही सलमान रोजंदारीवर काम करणाऱ्या तब्बल 25000 जणांच्या मदतीसाठी धावून आला आहे.

संबंधित - मुस्लिमांनी ‘राम नाम’ जप करीत केला अंत्यसंस्कार, दु:खात माणुसकी धावून आली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 29, 2020 06:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading