जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'ते कधी चुकीचं वागू शकत नाही'; किशोरी पेडणेकरांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक, दुसऱ्याच क्षणी म्हणाल्या..

'ते कधी चुकीचं वागू शकत नाही'; किशोरी पेडणेकरांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक, दुसऱ्याच क्षणी म्हणाल्या..

'ते कधी चुकीचं वागू शकत नाही'; किशोरी पेडणेकरांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक, दुसऱ्याच क्षणी म्हणाल्या..

किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या, की एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मी जितकं पाहिलं आहे त्यावरून ते कधी चुकीचं वागू शकत नाही. मात्र आता ते भाजपची लिहून दिलेली स्क्रिफ्ट वाचून दाखवत आहे.

  • -MIN READ Raigad,Maharashtra
  • Last Updated :

रायगड 29 ऑगस्ट : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यात आलं. मात्र, यादरम्यान मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या सातत्याने शिंदे गटातील आमदारांचं मन वळण्याचा प्रयत्न करताना दिसल्या. कधी भावनिक साद तर कधी टीका करत त्यांनी शिंदे गटातील आमदारांबद्दल मत मांडलं. आता पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. ‘विहिरीत उडी घेईल, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही’; नितीन गडकरी असं का म्हणाले? सांगितला तो किस्सा किशोरी पेडणेकर म्हणाल्या, की ‘एकनाथ शिंदे यांना मी जितकं पाहिलं आहे त्यावरून ते कधी चुकीचं वागू शकत नाही. मात्र आता ते भाजपची लिहून दिलेली स्क्रिफ्ट वाचून दाखवत आहे. पुढे त्यांनाही समजेल की आपण कसं चुकीचं केलं. गुवाहाटी प्रकरण नाकारणाऱ्या भाजपचं बिंग एकनाथ शिंदे यांनीच फोडलं आणि सांगितलं की आपण कसं रात्रीचं भेटत होतो.’ पनवेल विधानसभा मतदारसंघाचा मेळावा रविवारी खारघर इथे पार पडला. या मेळाव्यात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्या बोलत होत्या. रोहित पवार अडचणीत येणार? गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान, काँग्रेसला अध्यक्ष मिळणार TOP बातम्या दरम्यान दोन दिवसांपूर्वीच किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. मुंबई मनपात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या संदर्भात एक पत्र नितेश राणे यांनी आयुक्तांना लिहिलं होतं. त्यावर भाष्य करताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं, की नितेश राणे हे रात्रीचं पत्र लिहितात का, हे मला माहिती नाही. भ्रष्ट बोलणाऱ्यांनाच तुम्ही गोदीत घेतलं आहे, त्यांचं काय करणार आहात हे आधी सांगा. मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करायची असेल तर खुशाल करावी. पण हे विसरू नये की 25 मधील 20 वर्ष ते आमच्या सोबतच होते.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात