मुंबई, 1 जानेवारी: किरीट सोमय्या यांनी कालच एक ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा देखील सुरू आहे. 'उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षांत ठाकरे परिवाराचे 19 बंगले, अनिल परब यांचे साई रिसॉर्ट, किशोरी पेडणेकर यांची एस आर ए सदनिका, मुंबई महापालिकेतील घोटाळा याचा सर्व हिशोब पूर्ण करणार' असल्याचं किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ंत्यानंतर आज सोमय्या यांनी रेवदंडा पोलिसांना पत्र लिहीत 19 बंगल्याप्रकरणी उद्धव ठाकरे आणि तत्कालीन जिल्हाधिकारी तसेच रायगडचे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
किरीट सोमय्यांचा नेमका आरोप काय?
निवडणूक घोषणा पत्रामध्ये उध्दव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावावरील कोर्लाई येथील 19 बंगले दाखवले नाहीत. कर लागू असलेले हे बंगले आता गायब झाले आहेत. उध्दव ठाकरे यांनी पदाचा गैरवापर करत अधिकार्यांवर दबाव आणल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
हेही वाचा : चिल्लर लोकांना किंमत देत नाही; 'त्या' वक्तव्यावरून सुषमा अंधारे करणी सेनेवर भडकल्या
सोमय्यांचे पोलिसांना पत्र
दरम्यान या प्रकरणात आता किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलिसांना एक पत्र देखील लिहीले आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे तत्कालीन जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या पत्राद्वारे किरीट सोमय्या यांनी आज रेवदंडा पोलीसांकडे केली आहे. दरम्यान किरीट सोमय्या यांनी कालच एक ट्विट केलं होतं, 'उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षांत ठाकरे परिवाराचे 19 बंगले, अनिल परब यांचे साई रिसॉर्ट, किशोरी पेडणेकर यांची एस आर ए सदनिका, मुंबई महापालिकेतील घोटाळा याचा सर्व हिशोब पूर्ण करणार' असं या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज सोमय्या यांनी पोलिसांना पत्र दिल्यानं राजकीय वर्तृळात चर्चा रंगताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Kirit Somaiya, Shiv sena, Uddhav Thackeray