पुणे, 1 जानेवारी : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे, भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांंनी करणी सेनेवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. करणी सेनेकडून जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं, या वक्तव्याचा समाचार अंधारे यांनी घेतला आहे. त्या आज कोरेगाव भीमा येथे बोलत होत्या. नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे? करणी सेनेकडून जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं, या वक्तव्याचा चांगलाच समाचार अंधारे यांनी घेतला आहे. या चिल्लर लोकांना मी किंमत देत नाही. यांचे बोलवते धनी ज्या भाजपमध्ये आहेत, त्या भाजप नेत्यांना आंबेडकरी जनता काय आहे हे मी दाखवून देईल, असा घणाघात अंधारे यांनी केला आहे. हेही वाचा : 24 तासांच्या आत माफी मागा अन्यथा…, भाजपकडून अजित पवारांना अल्टिमेटम शिंदे, भाजप सरकारवर निशाणा दरम्यान त्यांनी यावेळी शिंदे, भाजप सरकारवर देखील निशाणा साधला आहे. सत्तेतील कोणताही मंत्री या ठिकाणी येणे अपेक्षित नाही.कारण पेशवाईचा पाढा म्हणून हा जयस्तंभ उभारला गेला, त्याच पेशवाईचा वसा आणि वारसा चालविणारे लोक या सरकारमध्ये आहेत असं अंधारे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







