जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kirit Somaiya: किरीट सोमय्यांनी दिलं थेट शरद पवारांना चॅलेंज, पाहा काय म्हणाले...

Kirit Somaiya: किरीट सोमय्यांनी दिलं थेट शरद पवारांना चॅलेंज, पाहा काय म्हणाले...

किरीट सोमय्यांनी शरद पवारांना दिलं खुलं आव्हान, म्हणाले...

किरीट सोमय्यांनी शरद पवारांना दिलं खुलं आव्हान, म्हणाले...

Kirit Somaiya on Sharad Pawar family: पवार फॅमिली जनतेला लुटण्याचे काम करतायत त्यांना उघडे पाडण्याचे काम मी करतोय असं वक्तव्य किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सोलापूर, 17 ऑक्टोबर : महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री यांनी भ्रष्टाचार (Corruption) केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somiya) करत आहेत. यासोबतच जरंडेश्वर साखर कारखान्याच्या (Jarandeshwar Sugar Factory) मुद्द्यावरुन अजित पवारांवर (Ajit Pawar) निशाणा साधत आहेत. त्याच दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे निकटवर्तीय आणि बहिणींच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली. आयकर विभागाच्या या कारवाईवर शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रतिक्रिया दिल्यानंतर आता किरीट सोमय्यांनी थेट शरद पवारांना चॅलेंज केलं आहे. पवार फॅमिली जनतेला लुटण्याचं काम करत आहे त्यांना उघडे पडण्याच काम मी करतोय असं ही विधान सोमय्यांनी केलं आहे. शरद पवारांना चॅलेंज अजित पवारांवर केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे सोमय्या इडी आणि इनकम टॅक्स ला पाठवणार आहेत. हे पुरावे खोटं असल्याच शरद पवारांनी सिद्ध करावे, असं चॅलेंज ही सोमय्यांनी पवारांना केलं आहे. शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी आरोप खोटं असल्याच सिद्ध करावं असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मित्र परिवाराकडून 184 कोटींचे इनामी व्यवहार ईडीच्या छाप्यात सापडली आहे. शिवाजी व्हेंचर प्रायवेट लिमिटेड, इंडो प्रायवेट लिमिटेड कोणाची? या दोन्ही कंपन्यांनी अजित पवारांना दहा वर्षांपूर्वी 100 कोटी दिले होते. संजय राऊतांनी चोरीचा माल परत केला तसा अजित पवार परत करणार आहेत का ? असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे. अजित पवारांच्या भगिनी नीता पाटील, विना पाटील आणि मेहुणे मोहन पाटील यांचा जरंडेश्वर साखर कारखान्यापासून विविध कंपन्यात पार्टनरशीप आहे. त्यामुळे अजित पवारांनी आपल्या बहिणींशी बेईमानी केली की महाराष्ट्रातील जनतेशी बेईमानी केली? याच उत्तर अजित पवारांनी द्यावं असं ही किरीट सोमय्यांनी म्हटलंय. पुन्हा येणे जमेना म्हणून आयकर विभागाच्या धाडी, शरद पवारांची सडकून टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणी आणि मुलगा पार्थ पवार यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली होती. पण, या प्रकरणी खुलासा करण्यासाठी भाजपचे नेते पुढे येत होते. माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष बोलत होते. मुळात ते पुन्हा येईन म्हणाले होते, पण ते जमेना म्हणून सरकार अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे’, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ‘अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी तब्बल 5 दिवस छापे मारले. मध्यमवर्गीय घरात इतके दिवस छापे टाकायला लावले. त्यांना पुढचा आदेश येईपर्यंत दबाव टाकून 5-5 दिवस छापे टाकायला लावले गेले, हे बरोबर नाही. दोन दिवस पाहुणे ठिक असतात पण आठ दिवस पाहुणे राहायला लागले तर वैताग येतो. अधिकाऱ्यांना वरून फोन यायचा. त्यानंतर ते मुक्काम वाढवून होते, असा धक्कादायक खुलासा पवार यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात