मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धुळ्याला जाण्यासाठी uber कार बुक केली, चालकाला संपवले पण fastag ने अडकवले!

धुळ्याला जाण्यासाठी uber कार बुक केली, चालकाला संपवले पण fastag ने अडकवले!

कार चोरण्याच्या उद्देशाने उत्तरप्रदेश भदोई (Uttar Pradesh Bhadohi) येथून पाच जण 4 ऑगस्टला कल्याणमध्ये आले होते.

कार चोरण्याच्या उद्देशाने उत्तरप्रदेश भदोई (Uttar Pradesh Bhadohi) येथून पाच जण 4 ऑगस्टला कल्याणमध्ये आले होते.

कार चोरण्याच्या उद्देशाने उत्तरप्रदेश भदोई (Uttar Pradesh Bhadohi) येथून पाच जण 4 ऑगस्टला कल्याणमध्ये आले होते.

 कल्याण, 12 ऑगस्ट : धुळे (dhule) येथे जाण्याच्या बहाणा करीत एक टोळीने कल्याणमधून (kalyan) उबेरची कार (uber car) बुककरून चालकाची हत्या (driver murder) केली आणि कार देखील चोरून नेल्याची घटना घडली होती. दरम्यान, या टोळीला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी (Kalyan Mahatma Phule Police)  अटक केली आहे. कारमध्ये लावण्यात आलेल्या फास्टटॅग (fastag ), टोल नाक्यावरील सीसीटीव्हीमुळे कार चोरीचा आणि हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

कार चोरण्याच्या उद्देशाने उत्तरप्रदेश भदोई (Uttar Pradesh Bhadohi) येथून पाच जण 4 ऑगस्टला कल्याणमध्ये आले होते. कल्याण स्थानकात उतरल्यानंतर त्यांनी रात्री 11 वाजेच्या सुमारास कल्याण ते धुळे जाण्यासाठी उबेर कंपनीची कार त्यांनी बुक केली. कंपनीकडून अमृत गावडे कार चालकाला हे भाडे देण्यात आले. अमृतने कल्याणच्या शिवाजी चौकातून या पाच आरोपींना गाडीत बसवून गाडी धुळ्याच्या दिशेने वळवली.

किम शर्माने शेयर केला पोल डान्सचा VIDEO, Ex-Boyfriend युवराज सिंगने केलं Troll

मात्र हत्येच्या तयारी निशी आलेल्या आरोपींनी अमृतच्या गळ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह दोरीने बांधून तो कसारा घाटात फेकून देत गाडी घेऊन उत्तर प्रदेशच्या दिशेने पळून गेले. मात्र कार मालकाने या गाडीला फास्टटॅग ऑन केलेला असल्यामुळे गाडीने टोल नाका क्रॉस करताच मालकाच्या खात्यातून टोल नाक्याचा चार्ज कापला.

मात्र, काही वेळाने मालकाला गाडी उत्तर प्रदेशमध्ये पोहचल्याचे लक्षात आले. दरम्यान, चालकाचा कोणताही संपर्क होत नसल्याने मालक प्रमोद कुमार गुप्ता याने कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत गाडीसह चालक हरविल्याची तक्रार दाखल केली होती. यात त्याने गाडी उत्तर प्रदेशपर्यंत पोहचल्याची माहिती दिल्याने महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या पथकाने टोल नाल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवून त्याचा ठाव ठिकाणा शोधला.

बुडणाऱ्या जिजाला वाचवण्याऐवजी मेहुणा गेला पळून, दारूच्या नशेत नात्याचाही विसर

यानंतर उत्तर प्रदेशमधील भदोई गावातून आरोपी राहुलकुमार गौतम, धर्मेंद्रकुमार गौतम, अमन गौतम या तीन आरोपीसह चोरलेली कार आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार, चालकाचा मोबाईल, आधारकार्ड, पनकार्ड, मास्टरकार्ड, आरसी बुक, रेल्वेची पावती जप्त करण्यात आली आहे. इतर तीन आरोपीचा शोध उत्तर प्रदेश पोलिसाच्या मदतीने सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. दरम्यान, गॅरेज चालक अमन गौतम याने चोरीची गाडी विकण्याची तयारी केली होती. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी आरोपीना अटक केल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.

First published:
top videos