मुंबई, 13 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. किमने आता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोल डान्सचा (Kim Sharma Poll Dance) व्हिडिओ शेयर केला. हा व्हिडिओ शेयर केल्यानंतर अनेकांनी तिचं कौतुक केलं, पण तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने (Yuvraj Singh) मात्र तिच्या या व्हिडिओची खिल्ली उडवली.
या व्हिडिओमध्ये किम शर्मा ब्लॅक स्पोर्ट्स ब्रा आणि गुलाबी शॉर्ट्समध्ये पोल डान्स करताना दिसत आहे. किमचा हा व्हिडिओ पाहून तिचे अनेक चाहते घायाळ झाले. वाह, काय सूर आहे, मॅडम तुम्ही कोणतं गाणं म्हणत आहात? असा टोमणा युवराजने या व्हिडिओवर मारला. किम शर्मासोबत मोहब्बतेंमध्ये काम केलेली अभिनेत्री प्रिती झांगियानीने देखील या पोस्टवर कमेंट केली.
View this post on Instagram
युवराज सिंग आणि किम शर्मा जवळपास 3 वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. 2007 साली हे दोघं वेगळे झाले. काहीच दिवसांपूर्वी किम शर्मा टेनिसपटू लिएंडर पेससोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करत होती. दुसरीकडे युवराजने हेजल कीचसोबत लग्न केलं आहे. युवराज, हेजल आणि किम यांच्यात चांगली मैत्री आहे. हे तिघं 2019 साली युवराजने निवृत्ती घेतल्यानंतरच्या पार्टीमध्ये एकत्र दिसले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Yuvraj singh