भुसावळ, 20 मे: मुंबईहून अकोल्याकडे पायी निघालेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लिफ्ट देण्याचा बहाणा करून तिचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही जळगाव जिल्ह्याच्या हद्दीत घडली असून अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. हेही वाचा… भीषण अपघात, सोलापूर-धुळे महामार्गवर इंधनाच्या टँकरचा स्फोट, ड्रायव्हरचा कोळसा! मिळालेली माहिती अशी की, मुंबई येथील मुलुंड परिसरात मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे एक कुटुंब कधी पायी तर कधी मिळेल त्या वाहनाने अकोल्याला निघालं होतं. पायी चालत असलेल्या या कुटुंबाला नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकीस्वाराने लिफ्ट देण्याची तयारी दर्शवली. ऐन दुपारच्या उन्हाची वेळ असल्याने सदर कुटुंबातील सतरा वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षीय मुलगी दुचाकीवर बसून पुढच्या प्रवासाला निघाली होती. काही किलोमीटर अंतरावर गेल्यावर सदर तरुणाने मुलीच्या भावास पुढे पोलिस असल्याचा बहाणा करून उतरण्यास सांगितलं. पोलिसांची गाडी गेल्यावर पुन्हा गाडीवर बसवतो. आम्ही पुढे थांबतो असं सांगितलं. मुलीच्या भावाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो गाडीवरून उतरून पायी चालू लागला. मात्र बरंच अंतर पुढे गेल्यावरही आपली बहीण आणि लिफ्ट देणारा तरुण आढळून आला नाही. नंतर मुलीच्या भावाने झालेला प्रकार मागून आलेल्या आई-वडिलांना सांगितली. हेही वाचा.. ‘हिजडा’ शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर.., चक्क तृतीयपंथियाने निलेश राणेंना सुनावलं मुलीच्या आई-वडिलांनी नशिराबाद पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सगळा प्रकार सांगितला. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आला. पोलिसांचे पथक आरोपी आणि अल्पवयीन मुलीच्या शोधार्थ रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.