भीषण अपघात, सोलापूर-धुळे महामार्गवर इंधनाच्या टँकरचा स्फोट, ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू

भीषण अपघात, सोलापूर-धुळे महामार्गवर इंधनाच्या टँकरचा स्फोट, ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, यात एकाचा भाजून अक्षरशः कोळसा झाला.

  • Share this:

बीड, 20 मे: सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी भीषण अपघात झाला आहे. इंधनाच्या टँकरचा स्फोट होऊन त्यात ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गवर बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाटात बुधवारी सकळी 11 च्या सुमारास इंधनाचा टँकर पलटी झाला. टँकर पलटी होताच त्याने पेट घेतला. यावेळी इंधनाचा स्फोट झाला यात ड्रायव्हरचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर भाजला गेला आहे. त्याला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा.. 'हिजडा' शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर.., चक्क तृतीयपंथियाने निलेश राणेंना सुनावलं

स्फोटानंतर आगीचे आणि धुराचे लोट आकाशात पसरले होते. साधारण 2 किलोमीटर वरून ते दिसत होते. या आगीमुळे परिसरात डोंगरावरील गवत पेटले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन आगीवर नियंत्र मिळवलं. ऐन घाटात हा प्रकार झाल्याने काहीकाळ वाहतूक थांबवण्यात आली होती.

पोलिस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, यात एकाचा भाजून अक्षरशः कोळसा झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे.  बीड येथील मांजरसुंबा घाटात इंधनाच्या टँकरला अपघात झाला. त्यानंतर टँकरने पेट घेतल्याने त्याचा स्फोट झाला. त्यामुळे अगीच्या ज्वाला उठल्या होत्या. गाडीत एक जण जळून खाक झाला. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पडलेली नाही.

हेही वाचा...गडचिरोली बंद! सृजनाक्काच्या हत्येच्या निषेधार्थ माओवाद्यांनी जाळली 4 वाहनं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2020 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading