सोलापूर, 15 नोव्हेंबर: कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) आज पहाटे श्री विठ्ठल- रुक्मिणीची (Vitthal-Rukmini) शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते करण्यात आली. पहाटे तीनच्या सुमारास पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दर्शन रांगेतील कोंडीबा देवराव टोणगे (Kondiba Tonage) (वय 58) आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई कोंडीबा टोणगे (Prayagbai Tonage) (वय 55, राहणार मु. निळा, पो. सोनखेड, ता. लोहा, जिल्हा नांदेड) या दाम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. आज पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार सहपत्नीक विठ्ठल मंदिरात दाखल झाले होते.
आज 'कार्तिकी एकादशी'निमित्त महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची सपत्नीक शासकीय महापूजा केली. श्री पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेऊन येत्या काळात महाराष्ट्रातून, देशातून, जगातून कोरोना पूर्णपणे नाहीसा कर, असं साकडं घातलं.#KartikiEkadashi pic.twitter.com/umP5hCLsKF
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 15, 2021
चौखांबी येथे संकल्प सोडून अजित पवारांच्या हस्ते पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांनी विठूरायाची षोडशोपचारे पूजा पार पडली. यानंतर तीन वाजता रुक्मिणी मातेची पूजा झाली. शेतकरी असलेले हे दाम्पत्य गेली तीस वर्षे सलग पंढरीच्या वारीसाठी येत आहे. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, सौ. पवार तसेच वारकरी प्रतिनिधीचा मान मिळालेल्या टोणगे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील सपत्नीक उपस्थित होते. हेही वाचा- लातूर: एकाच झाडाला गळफास घेऊन अल्पभूधारक शेतकरी जोडप्यानं संपवलं जीवन श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. कोरोनाच्या संकटामुळे मंदिर प्रशासनाने जाहीर केल्यानुसार मोजक्याच लोकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला होता. नांदेड जिल्ह्यातल्या वारकरी प्रतिनिधीचा मान यंदाच्या वर्षी हा मान कोंडीबा देवराव टोणगे (वय 58) व पऱ्यागबाई कोंडीबा टोणगे (वय 55, रा. निळा, सोनखेड, ता.लोहा, जि. नांदेड ) यांना मिळाला. हे पती-पत्नी मागील तीस वर्षापासून विठुरायाचे यात्रा करत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. हेही वाचा- द्रविडच्या मुलानं केलेल्या फोनमुळे ‘द वॉल’ बनला हेड कोच! गांगुलीनं सांगितला ‘तो’ किस्सा कार्तिकी एकादशी पूजेच्या वेळी विठुरायाला निळ्या रंगाचा बनारसी अंगरखा, पितांबर, शेला तर श्री रुक्मिणी मातेला हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसवण्यात आली आहे. त्यामुळे सावळ्या विठुरायाचे अर्थात राजस सुकुमाराचे आणि श्री रुक्मिणीतेचे रूप अधिक खुलून दिसून येत आहे.