मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लातूर: एकाच झाडाला गळफास घेऊन अल्पभूधारक शेतकरी जोडप्यानं संपवली जीवनयात्रा

लातूर: एकाच झाडाला गळफास घेऊन अल्पभूधारक शेतकरी जोडप्यानं संपवली जीवनयात्रा

Suicide in Latur: लातुर तालुक्यातील गादवड येथे एका अल्पभूधारक शेतकरी जोडप्यानं आत्महत्या (Farmer Couple commits suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

लातूर, 15 नोव्हेंबर: लातुर तालुक्यातील गादवड येथे एका अल्पभूधारक शेतकरी जोडप्यानं आत्महत्या (Farmer Couple commits suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गादवड शिवारातील लिंबाच्या झाडाला दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले आहेत. एकाच दिवशी पती-पत्नीनं अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शनिवारी मुरुड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

बळीराम रावसाहेब कदम (वय-50) आणि वैशाली ऊर्फ मंगलबाई बळीराम कदम असं आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहेत. ते लातूर तालुक्यातील गादवड गावातील रहिवासी आहे. संबंधित शेतकरी जोडप्यानं शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास सारसा रस्त्यावर असलेल्या त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

हेही वाचा-नागपुरातील महिलेची मध्य प्रदेशात विक्री; 16 महिन्यांनी भयावह अवस्थेत आढळली पीडित

पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेत तांदुळजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. संबंधित शेतकरी जोडप्यानं नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मुरुड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू केला आहे. नातेवाईक आणि आसपासच्या लोकांची चौकशी करत पोलीस नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा-अस्मानी संकटांना नडला पण बँकेच्या नोटीशीपुढे हरला; शेतकऱ्यानं बँकेसमोरच दिला जीव

मृत शेतकरी दाम्पत्याला दोन एकर शेतजमीन होती. त्यांचा स्वभाव शांत आणि संयमी होता. ते सर्वांसोबत मिळून मिसळून राहायचे, अशी माहिती आसपासच्या लोकांनी दिली आहे. अशा या मनमिळावू दाम्पत्यानं अचानक आयुष्याचा शेवट केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Latur, Suicide