मुंबई, 15 नोव्हेंबर: टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडनं (Rahul Dravid) भारतीय क्रिकेट टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) खराब कामगिरीनंतर भारतीय फॅन्सना द्रविडकडून मोठी अपेक्षा आहे. द्रविडनं मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) सुरूवातीपासूनच आग्रही होते. त्यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात द्रविडला मुख्य प्रशिक्षक बनवण्याबाबत विचालेल्या एका प्रश्नाला उत्तर दिलं. शारजाहमधील आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात गांगुली सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला मजेशीर उत्तर दिले. ‘मला राहुल द्रविडच्या मुलाचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितले की, माझे बाबा खूप कडक आहेत. त्यांना दूर पाठवण्याची गरज आहे. त्यानंतर मी राहुलला (द्रविड) फोन केला आणि तू राष्ट्रीय टीमचा कोच होण्याची वेळ आता आली आहे.’ असं सांगितलं. ‘आम्ही एकत्र मोठे झालो आहोत. जवळपास एकाच वेळी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. तसंच बराच काळ एकत्र घालवला आहे. त्यामुळे मला द्रविडशी संवाद साधणे सोपे गेले,’ असं गांगुलीनं पुढं सांगितलं. राहुल द्रविड पूर्णवेळ प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाची पहिली सीरिज न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. भारतीय टीम न्यूझीलंड विरुद्ध 3 वन-डे आणि 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर टीम इंडिया रवाना होईल. क्रिकेट विश्व गाजवणारी टीम इंडियाची त्रिमूर्ती एकत्र, आता सचिनच्या इनिंगची सर्वांना प्रतीक्षा लक्ष्मण होणार NCA प्रमुख राहुल द्रविडचा द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) संचालक होण्यास व्ही.व्ही.एस. लक्ष्मणनं होकार दिल्याचं वृत्त न्यूज एजन्सी ANI नं दिलं आहे. द्रविडनं टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक व्हावं आणि लक्ष्मणनं NCA मध्ये त्याची जागा घ्यावी यासाठी गांगुली आग्रही होते. गांगुलींचे हे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. द्रविड आणि लक्ष्मण यांच्यात उत्तम समन्वय आहे. हेच समन्वय टीम इंडिया आणि NCA मध्ये असावं असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. त्यामुळे लक्ष्मणनं ही जबाबदारी स्वीकारावी असा गांगुलींचा आग्रह होता. लक्ष्मण सध्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) या टीमचा मेंटॉर आहे. NCA अध्यक्ष झाल्यावर त्याला हे पद सोडावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.