जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / करिनाची अखेर मालवली प्राणज्योत, आता कोरोना टेस्ट रिपोर्टची प्रतिक्षा

करिनाची अखेर मालवली प्राणज्योत, आता कोरोना टेस्ट रिपोर्टची प्रतिक्षा

करिनाची अखेर मालवली प्राणज्योत, आता कोरोना टेस्ट रिपोर्टची प्रतिक्षा

सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील करिना वाघिणीचा अखेर बुधवारी मृत्यू झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद, 24 जून: औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील करिना वाघिणीचा अखेर बुधवारी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती गंभीर झाली होती. किडनी फेल झाल्यामुळे करिना मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिचा कोरोना टेस्ट रिपोर्ट येणे बाकी आहे. मंगळवारी करिनाची कोविड टेस्ट करण्यात आली होती. देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. प्राण्यांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात होती. हेही वाचा… लॉकडाऊनमुळे मोठी वेतन कपात, औरंगाबादेत तरुण शिक्षिकेनं उचललं टोकाचं पाऊल सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील करिना वाघिणी दोन दिवसांपासून सलाईनवर होती. तिला अतिशय अशक्तपणा आला होता. तिला कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात होतं. अखेर मंगळवारी तिची कोरोना टेस्ट करण्यात आली. बुधवारी म्हणजे आज त्याचा रिपोर्ट येणार आहे. मात्र, त्याआधीच करिना वाघिणीनं जगाचा निरोप घेतला आहे. करिना वाघिण 6 वर्षांची होती. अमेरिकेत वाघाला कोरोनाची लागण.. अमेरिकेतील एका प्राणिसंग्रहालयातील वाघाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. तेव्हापासून सर्व प्राणिसंग्रहालयाने अधिक काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. करिना वाघिणीचे कोरोनाचा चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले आहे. डॉक्टरांनी पीपीई किट परिधान करुन वाघिणीच्या लाळेचे नमुने घेतले. बुधवारी सायंकाळपर्यंत याचा रिपोर्ट येईल, असा अंदाज आहे. त्याशिवाय तिच्या रक्ताचे व लघवीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हेही वाचा… खेळता खेळता पाझर तलावाकडे वळले पाय, एकाच कुटुंबातील पाच मुलींचा बुडून मृत्यू दुसरीकडे, देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थिती प्राण्यांमध्येही कोरोनाचा फैलाव होतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात