Home /News /maharashtra /

खेळता खेळता पाझर तलावाकडे वळले पाय, एकाच कुटुंबातील पाच मुलींचा बुडून मृत्यू

खेळता खेळता पाझर तलावाकडे वळले पाय, एकाच कुटुंबातील पाच मुलींचा बुडून मृत्यू

भोकरदन तालुक्यातील तळेगाव वाडी या गावातील मुली पाझर तलावाजवळ खेळत होत्या.

जालना, 23 जून: खेळता खेळता पाझर तलावात बुडून एकाच कुटुंबातील 5 मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भोकरदन तालुक्यातील तळेगाव वाडी येथे ही मंगळवारी सायंकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. मृत पाचही मुली 5 ते 7 वयोगटातील होत्या. या घटनेमुळे तळेगाव वाडी गावावर शोककळा पसरली आहे. भोकरदन तालुक्यातील तळेगाव वाडी या गावातील मुली पाझर तलावाजवळ खेळत होत्या. दरम्यान 5 मुलींचा या पाझर तलावात बुडून करुण अंत झाला. आशुबी पठाण-6 वर्षे, नबीबाबी पठाण-6 वर्षे, अल्फीदाबी पठाण-7 वर्षे, सानियाबी पठाण-6 वर्षे आणि शब्बुबी पठाण-5 वर्षे अशी मृत मुलींची नावं आहेत. या मुली खेळताना पाझर तलावात पडल्या असाव्यात किंवा पोहताना बुडाल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हेही वाचा..लॉकडाऊनमुळे मोठी वेतन कपात, औरंगाबादेत तरुण शिक्षिकेनं उचललं टोकाचं पाऊल घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले असून घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. एकाचवेळी या पाच अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर दुःखाचं सावट पसरलं आहे. शेततळ्यात बुडून 4 भावंडांचा मृत्यू अहमदनगर जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. शेततळ्यात बुडून चार भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 7 ते 15 वयोगटातील ही मुले आहेत. अहमदनगरमधील श्रीगोंदा येथील बाबुर्डी गावात मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे हातावर पोट भरणाऱ्या ऊस कामगाराच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी गावात उत्तर प्रदेशातील काही मजूर या गावातील ऊसाच्या गुऱ्हाळवर कामाला आले आहेत. त्यांची मुले मंगळवारी दुपारी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. त्यामध्ये चार भावांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. मुले तळ्यात पोहण्यासाठी गेली असावीत. तळ्यातील प्लास्टिकच्या कागदामुळे ती घसरून पडली असावीत असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. हेही वाचा..लॉकडाऊनमध्ये वीज बिलाचा 'शॉक' बसलेल्यांना दिलासा, ऊर्जा मंत्र्यांची मोठी घोषणा पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. या चारही भावडांचे चौघांचे मृतदेह नागरिकांच्या मदतीने शेततळ्यातून बाहेर काढले आहेत. मृत मुलांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. या घटनेमुळे बाबुर्डी गावावर शोककळा पसरली आहे.
First published:

Tags: Jalna, Jalna Crime, Marathwada

पुढील बातम्या