लॉकडाऊनमुळे मोठी वेतन कपात, औरंगाबादेत तरुण शिक्षिकेनं उचललं टोकाचं पाऊल

कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाळ कोसळली आहे तर अनेकांच्या वेतनात कपात झाली आहे.

कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाळ कोसळली आहे तर अनेकांच्या वेतनात कपात झाली आहे.

  • Share this:
औरंगाबाद, 23 जून: कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाळ कोसळली आहे तर अनेकांच्या वेतनात कपात झाली आहे. वेतन कपात झाल्यामुळे एका तरुण शिक्षिकेनं गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेने वेतन कपात केल्यामुळे सावकारी कर्जाचं व्याज थकल्यामुळे शिक्षिकेनं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. औरंगाबादेतील सिडको परिसरात ही धक्कादायक घटना घडली. हेही वाचा..भाऊ दारू पिऊन घरात घालायचा धिंगाणा, लहान भावाला राग आला आणि... प्रतीक्षा भरत काळे असे (वय-25) आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. शिक्षिकेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. 3 दिवसांनी सापडली सुसाईड नोट... शिक्षिका प्रतीक्षा काळे हिने मानसिक तणावातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता तब्बल तीन दिवसांनी सुसाईड नोट सापडली आहे. सुसाईड नोटमधून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. खासगी सावकारानं व्याजाच्या पैशासाठी सारखा तगादा लावला होता. याला कंटाळून प्रतीक्षा हिने आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी व्याजासाठी छळणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी एकाला अटक केली आहे. एक आरोपी आजारी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे अद्याप त्याला अटक झाली, नसल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. हेही वाचा..पत्नीच्या पेटत्या चितेवर पतीनं घेतली उडी, अवघ्या 3 महिन्यांतच मोडला संसाराचा डाव! प्रतीक्षा काळे आपल्या वडिलांची लाडकी लेक, उच्चशिक्षित आणि हुशार असलेल्या प्रतीक्षाला नुकतीच एका शाळेत नोकरी मिळाली होती. वडील भरत काळे एका वृत्तपत्रात मार्केटिंगचे काम करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची नोकरी गेल्याने कुटुंबाचा गाडा आर्थिक चणचणीत अडकला होता. त्यामुळे त्यांनी एका सावकाराकडून महिन्याला 10 टक्के व्याजाने 40000 रुपये घेतले होते, अशी माहिती मिळाली आहे.
First published: