डोंबिवली, 10 फेब्रुवारी : अखेर कल्याण लोकसभेतील सर्व सरपंचपदाच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये शिवसेना, भाजपला सम-समान सरपंच पद मिळाल्याचं दिसून आलं आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीला सरपंच पद मिळाले असून यावेळी मनसेनेही आपले खाते खोलले आहे. सरपंच निवडणुकीत दोन ठिकाणी मनसेने सेनेला पाठिंबा दिला आहे आणि एक ठिकाणी भाजपला पाठिंबा दिल्याचे दिसून आले आहे. तर राष्ट्रवादीनेही सेनेला पाठिंबा दिल्याचे दिसून आलं आहे. कल्याण लोकसभेचा विचार करता शिवसेनेला पाच, भाजपला पाच, राष्ट्रवादीला तीन आणि मनसेला एक सरपंच पद मिळाले असून सहा ग्रामपंचायतींनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. हेही वाचा - सरपंचपदाच्या निवडणुकीआधी धक्कादायक घटना; ग्रामपंचायत सदस्याचं अपहरण, नातेवाईकांमध्ये खळबळ ठाणे जिल्हा असो वा कल्याण याठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व नेहमीच दिसून आलं आहे. मात्र आता शिवसेनेच्याच बालेकिल्ल्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेने सुद्धा आपली ताकद वाढविल्याचं या निवडणुकीत दिसून आलं आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ग्रामपंचायत : पक्ष वडवली शिरढोण : सेना खोणी : सेना म्हारळ : सेना काकोळे : मनसे खरड : सेना पोसरी : भाजप वरप : राष्ट्रवादी कांबा : राष्ट्रवादी मांगरूळ : भाजप नाऱ्हेन : भाजप उसाटने : सेना-मनसे -राष्ट्रवादी बुद्रुल : राष्ट्रवादी मलंगवाडी : भाजप नेवाळी : भाजप निवडणुकीवर बहिष्कार असलेल्या ग्रामपंचायती पिंपरी, वाकलन, दहिसर, नागाव, नारीवली आणि काकडवाल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.