मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गोळीबार आणि चाकूने वार करून सराफाला लुटले, कामगाराचा मृत्यू, वाशिमधील घटना

गोळीबार आणि चाकूने वार करून सराफाला लुटले, कामगाराचा मृत्यू, वाशिमधील घटना

 योगेश अंजनकर आणि रवी वाळेकर हे घरी बॅग घेऊन जात असताना तीन मोटारसायकलवर आलेल्या सहा जणांनी चाकूने वार केले आणि गोळीबार केला.

    किशोर गोमाशे, प्रतिनिधी वाशिम, 21 डिसेंबर : वाशिम (washim) जिल्ह्याच्या मालेगाव (malegaon) शहरात एका ज्वेलर्स (jewelers) मालकावर प्राणघातक हल्ला करून लुटण्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी गोळीबार करून आणि चाकूने वार करून ज्वेलर्स मालकाला लुटले आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव शहरातील अंजनकर ज्वेलर्स हे दुकान बंद करून योगेश अंजनकर आणि त्यांचा सहकारी रवी वाळेकर हे दोघे रात्री पावणे दहा वाजेच्या दरम्यान घरी जात होते. योगेश अंजनकर आणि रवी वाळेकर हे घरी बॅग घेऊन जात असताना तीन मोटारसायकलवर आलेल्या 3 ते 4 दरोडेखोरांनी चाकूने वार केले आणि गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये योगेश अंजनकर यांचा सहकारी रवी वाळेकर यांचा चाकू व गोळी लागून मृत्यू झाला. तर सराफा व्यावसायिक योगेश अंजनकर हे गंभीर जखमी झाले आहेत. उदयनराजेंनी उडवली कॉलर, कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, LIVE VIDEO गंभीर जखमी झालेल्या रवी वाळेकर यांना वाशिम येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे तर योगेश अंजनकर यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत अज्ञात चोरट्यांची मोटरसायकल घटनास्थळी आढळून आली. घटनास्थळी सापडलेली मोटार सायकल चोरीची असल्याचं समजते. लग्न वाचवण्यासाठी कपलने 'हाईट'च केली; असा मार्ग निवडला की तुम्हीही हैराण व्हाल घटनास्थळी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल आहेत. मालेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरली असून नागरिकांची सुरक्षा ही धोक्यात आली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: WASHIM NEWS

    पुढील बातम्या