सातारा, 21 डिसेंबर : नेहमीच आपल्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध असणारे साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosle) यांनी आज पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांची मनं जिंकली. कार्यकर्त्यांनी उदयनराजेंवरील गाण्यावर बेफाम डान्स सुरू केला मग काय उदयनराजेंनीही कॉलर उडवून ठेका धरला.
साताऱ्यात आज उदयनराजे भोसले यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दस्तगीर कॉलनीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. उदयनराजे आले आणि चाहत्यांच्या उत्साहाचा पारवारा उरला नाही. उदयनराजेंचा सत्कार झाला. त्यानंतर उदयनराजे यांच्यावर लिहिलेले 'नाद नाही राजेंचा करायचा' हे गाणं लावलं.
सातारा : उदयनराजेंनी पुन्हा एकदा उडवली कॉलर, साताऱ्यातला व्हिडीओ pic.twitter.com/UosjArOnBo
— News18Lokmat (@News18lokmat) December 21, 2021
मग काय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष करत बेफाम डान्स केला. यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना आग्रह केला. मग काय उदयनराजेंनीही कॉलर उडवून ठेका धरला. उदयनराजेंनी ठेका धरलेला पाहून कार्यकर्त्यांचा आनंदाचा पारवारा उरला नाही. उदयनराजेंच्या नावाने घोषणा देत कार्यकर्ते तुफान नाचले. हा व्हिडीओ साताऱ्यात चांगलाच व्हायरल झाला आहे.
उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये वाद शिगेला!
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाक्ययुद्धाने वातावरण तापले आहे. दोन्ही राज्यांमध्ये टीकेची झोड उठली आहे. 'आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं वय वाढलं मात्र त्यांची बुद्धी वाढली नाही' अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती.
PKL : कोल्हापूरचा पठ्ठ्या सज्ज, 'करोडपती' सिद्धार्थ पुन्हा मैदान गाजवणार!
आता उदयनराजेंनी टीका केल्यानंतर शिवेंद्रराजेंनीही जशास तसे उत्तर दिले. 'उदयनराजेंची बुद्धी अफाट आणि अचाट आहे त्यांच्या बुद्धीशी कोणाची तुलना होऊ शकत नाही. त्यांच्या बुद्धीचे अविष्कार आणि पराक्रम सर्वांनी पाहिले आहेत. खासदार लोकांनी निवडून दिलेली लोकसभा घालवून राज्यसभेत जाऊन बसले असून जिथं तुम्ही पुढच्या दाराने जाऊन बसला होता तिथं आता तुम्ही मागच्या दाराने जाऊन खासदार म्हणून बसला. तुमची एवढी मोठी बुद्धी आहे तर जिल्हा बँकेच्या वेळी संचालक होण्यासाठी लोकांच्या घराचे उंबरठे दिवाळीचे डबे घेऊन का झिजवले? असा सवालच शिवेंद्रराजेंनी विचारला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.