मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संमेलनाध्यक्ष अन् मुख्यमंत्री ठाकरे ऑनलाइन बोललेच नाही, असा राहिला संमेलनाचा पहिला दिवस!

संमेलनाध्यक्ष अन् मुख्यमंत्री ठाकरे ऑनलाइन बोललेच नाही, असा राहिला संमेलनाचा पहिला दिवस!

'मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा आणि साहित्यिकांना स्वातंत्र्य असावं' असा सूर जवळपास सगळ्यांचाच होता.

'मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा आणि साहित्यिकांना स्वातंत्र्य असावं' असा सूर जवळपास सगळ्यांचाच होता.

'मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा आणि साहित्यिकांना स्वातंत्र्य असावं' असा सूर जवळपास सगळ्यांचाच होता.

नाशिक, 03 डिसेंबर : अखेर 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (akhil bharatiya marathi sahitya sammelan 2021) नाशिकमध्ये (nashik) सुरुवात झाली आहे. मात्र,साहित्य संमेलनाच्या इतिहासात या संमेलनाची एक वेगळीच नोंद झाली. ती म्हणजे, मावळते संमेलनाध्यक्षांना, नूतन समेलनाध्यक्षांना प्रत्यक्ष सूत्र देताच आली नाही. कारण मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो आणि नूतन समेलनाध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर ( Dr. Jayant Narlikar) दोघंही या संमेलनास अनुपस्थित होते. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) हे ऑनलाइन सहभागी होणार होते मात्र त्यांचाही ऑनलाइन सहभाग नव्हता.

कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून रखडलेले साहित्य संमेलन अखेरीस नाशिकनगरीत भरले. साहित्यांच्या मांदियाळीत संमेलनाला सुरुवात झाली. 'मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा आणि साहित्यिकांना स्वातंत्र्य असावं' असा सूर जवळपास सगळ्यांचाच होता. मात्र याच कार्यक्रमात स्वागताध्यक्ष आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेला खडा सवाल चर्चेत आला. 'संमेलन करण्यासाठी तुम्हाला राजाश्रय हवा मग राजकारणी का नको ?' असा सवालच भुजबळांंनी साहित्यकांना विचारला.

महाराष्ट्र पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, नेपाळी गँगच्या नांग्या ठेचण्यात यश

तर, कौतीकराव ठाले-पाटील यांनी आपल्या भाषणात दिलेल्या कानपिचक्या, जावेद अख्तर यांनी 'मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा का? व्यक्त झालं तर अँटीनॅशनल का ? हा सवाल उपस्थित केला.

संमेलन उद्घाटक पानिपतकार विश्वास पाटील यांनी, 'शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा जपा, असा सरकारला सल्ला देत, नागरी सेवेत काम करणाऱ्याला कसा त्रास होतो याकरीता मलाच गुन्हेगार कसं ठरवलं, ही खंत बोलून दाखवली.

'खरंतर साहित्यिकांची मांदियाळी मात्र,संमेलनाध्यक्ष निवडण्याची नियमावली आम्ही 3 वर्षांपूर्वी बदलली आणि तेव्हापासून या स्थानाला ग्रहण लागलं असं परखड मत साहित्य महामंडळ कार्यवाह कौतिकराव ठाले-पाटील यांनी व्यक्त करून थेट डॉ.जयंत नारळीकर यांच्या अनुपस्थितीवर बोट ठेवलं. आता पुन्हा एकदा ही नियमावली बदलण्याची वेळ आल्याचं स्पष्ट मत मांडलं.

पुजारा-रहाणे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार? टीम इंडियातून आली मोठी Update

साहित्यिक म्हणजे कोण? तर समाजातील प्रचलीत व्यवस्थेत असलेल्या चुकांवर बोट ठेवणारे सृजन सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकीय पक्ष, सरकार यांची अनास्था असल्याने थेट या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी या संमेलनात विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने हे संमेलन हायजॅक केल्याचा आरोप करून या संमेलनावर बहिष्कार टाकलेल्या नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी मात्र ग्रंथदिंडीत सक्रिय सहभाग घेतला होता.  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या या भूमीत,सावरकरांवर अन्याय केल्याचा आरोप हा वाद पहिल्या दिवसापासून सुरू झाला तो संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशीही कायम होता. अजून बाकी असलेल्या 2 दिवसात काय होणार ? हा प्रश्न आज तरी अनुत्तरीत आहे.

First published: