Home /News /crime /

कोट्यवधीचे कर्ज, मित्राचा खून आणि ब्युट्यूथ, सिनेस्टाईल घटनेमुळे पोलीसही झाले हैराण

कोट्यवधीचे कर्ज, मित्राचा खून आणि ब्युट्यूथ, सिनेस्टाईल घटनेमुळे पोलीसही झाले हैराण

मित्राचा खून करून तो अर्धवट जाळला आणि तो आपलाच मृतदेह असल्याचा भासवून पळ काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

    पिंपरी चिंचवड, 22 डिसेंबर : कर्ज घेतल्यानंतर ते फेडण्यासाठी अनेक जण आटोकात प्रयत्न करत असतात. बऱ्याच वेळा योग्य नियोजनामुळे कर्ज फेडलेही जाते. पण,  कर्जदारांना टाळण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) सिनेमालाही लाजवेल असा प्रसंग घडला आहे. मित्राचा खून करून तो अर्धवट जाळला आणि तो आपलाच मृतदेह असल्याचा भासवून पळ काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मेहबूब दस्तागिर शेख असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मेहबूब शेख याने आपलाच मित्र संदीप माईणकर यांचा खून केला. काही दिवसांपूर्वी बंगळूर आणि मुंबई महामार्गावर बाणेर इथं मोकळ्या जागेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला होता. पोलिसांनी जेव्हा मृतदेहाची पाहणी केली होती, तेव्हा मृतदेहाच्या खिश्यात अर्धवट जळालेली एक सुसाईड नोट आढळली होती. त्यावरून मृताची ओळख पटली होती. हा मृतदेह संदीप माईनकर (राहणार तुकारामनगर, पिंपरी चिंचवड) याचा मृतदेह असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मृत संदीप हा दारूच्या आहारी गेला होता. तो कुठेही फिरुन मिळेल ते अन्न खाऊन राहायचा. संदीप हा व वल्लभनगर येथील शिवभोजन थाळी केंद्रावर जेवण करत होता. त्यामुळे पोलिसांनी शिवभोजन केंद्रापासून तपास सुरू केला. पण, त्यांच्या ओळखीतील कुणीही समोर आलं नाही. घटनास्थळावर पोलिसांनी ब्ल्यूटूथ सापडले होते. त्याच्या आधारे तपास केला असता ब्ल्यूटूथचा मालक हा वाकड इथं राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो बेपत्ता असल्याची तक्रार वाकड ठाण्यात दाखल होती. ही बेपत्ता व्यक्ती होती मेहबूब शेख. पोलिसंनी मेहबूब शेखच्या नातेवाईकाच शोध घेतला असता त्याला दोन पत्नी असल्याचे समोर आले. त्याच्या पहिल्या पत्नीनेच तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. त्याची दुसरी पत्नीसुद्धा बेपत्ता होती. पोलिसांनी मेहबूबचा शोध सुरू केला असता तो दिल्लीला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस दिल्लीला पोहोचले पण तो पुण्याला निघून गेला होता. त्यामुळे पथकाने  पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांची नाव तपासली. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी दौंड रेल्वे स्थानकावर मेहबूबला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान मेहबुबने खुनाची कबुली दिली. मेहबूब यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे कर्जाची रक्कम मागण्यासाठी लोकं त्याच्याकडे तगादा लावत होते. त्यामुळे तगादा टाळण्यासाठी त्याने खुनाचा कट रचला. त्याने संदीप माईनकर यांचा खून केला आणि मृतदेह बाणेर भागात फेकून दिला. तसंच 'मी कर्जबाजारी झालो असून, मी माझा शेवट करीत आहे. माझी बॉडी ही बाणेर भागातच मिळेल',अशी सुसाईड नोट लिहून मेहबूब पसार झाला होता. पण, स्टॅम्प पेपर त्याने स्वत:कडे ठेवला होता. मृत संदीप आणि आरोपी मेहबूब दोघेही 15 वर्षांपूर्वी हाफकीन कंपनीत कामाला होते. कंपनी सोडल्यानंतर दोघेही वेगळे झाले होते. संदीप याला कुठेही काम मिळाले नाही. त्यामुळे तो दारूच्या आहारी गेला होता. तो कुठेही फिरायचा आणि राहायचा. त्याच्या मागेपुढे कुणीही नव्हते. त्यामुळे मेहबूब याने संदीपची निवड केली. 28 नोव्हेंबर रोजी मेहबूबने संदीपला हाफकीन कंपनीबाहेर भेटायला बोलावले. त्यानंतर त्याला बाणेर इथं नेऊन मेहबूबने त्याचा खून केला. त्यानंतर पहिल्या पत्नीसोबत मेहबूब पसार झाला होता. संदीपच्या मृतदेहाजवळ एक ब्युट्यूथ सापडले होते. जेव्हा पोलिसांनी मेहबूबच्या मोबाइलशी जोडले असता कनेक्ट झाले. पोलिसांनी मेहबूबला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या