जालना, 16 जुलै, रवी जैस्वाल : जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा महासचिवांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष आढाव असं त्यांचं नाव आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संतोष आढाव यांची हत्या त्यांच्या चुलत्यानंच केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. जमिनीच्या वादातून हत्येची शक्यता घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जालन्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव संतोष आढाव यांची हत्या झाली आहे. शेतीच्या वादातून चुलत्यानेच ही हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आढाव कुटुंबीयांना शासनाकडून रामनगर साखर कारखाना याठिकाणी गायरान जमीन मिळाली होती. मात्र याच जमिनीचा वाद संतोष आढाव आणि त्यांच्या चुलत्यात होता. रात्री चुलत्याने त्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. मात्र चर्चेदरम्यान वाद झाला आणि या वादातच संतोष आढाव यांची हत्या करण्यात आली.
मोठी बातमी! अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान राडा; राष्ट्रवादीचा पदाधिकारी गंभीर जखमी!घटनेनं खळबळ दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जात आरोपींना ताब्यात घेतलं आहे. संतोष आढाव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. जालन्यात या प्रकारानं खळबळ उडाली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.