अहमदनगर, 16 जुलै, साहेबराव कोकणे : अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात दोन गटात तुफान राडा झाला आहे. या घटनेत राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी दगडफेकही झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगरच्या सावेडी उपनगरातील एकविरा चौकात ही घटना घडली आहे. अंकुश चत्तर असं या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सावेडी उपनगरातील एकविरा चौकात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तुफान राडा झाला. दोन गटांमध्ये हाणामारी झाली. दगडफेक झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. या घटनेत राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी गंभीर जखमी झाला आहे. अंकुश चत्तर असं त्यांचं नाव आहे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कॉलेजमधील विद्यार्थिनीच्या माध्यमातून ओळख, नंतर सामूहिक बलात्कार करुन धर्मांतरणाचा प्रयत्न, धक्कादायक घटनाराड्याचं कारण अस्पष्ट शहरात जोरदार राडा झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा राडा नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती तोफखाना पोलिसांकडून देण्यात आली आहे.