मुंबई पोलीस दलात कोरोनाची दहशत! 9 पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

मुंबई पोलीस दलात कोरोनाची दहशत! 9 पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

मुंबई पोलीस दलात आतापर्यंत जवळपास 600 च्या आसपास पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 मे : कोरोनाविरुद्ध कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि पोलीस यांनाही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई पोलीस दलात (mumbai police) कोरोनामुळे सहावा बळी गुरुवारी गेला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक भगवान पार्टे यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली. 45 व्या वर्षी एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत पोलीस दलात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाचा धोका वाढत आहे. गुरुवारी 9 नवीन पोलीस कोरोना (coronavirus) पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या संख्येमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या पोलिसांना घरी राहण्याच्या सूचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहेत. मुंबई पोलीस दलात आतापर्यंत जवळपास 600 च्या आसपास पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईत गुरुवारी 998 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनाच्या एकूण रुग्णाची संख्या 16579वर पोहचली आहे. तर 512 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून गुरुवारी 1602 नवी रुग्ण सापडले असून विक्रमी रुग्णांची नोंद झाली. रुग्णाची एकूण संख्या ही 27524 वर गेली असून गुरुवारी 44 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या 1019 वर गेली आहे.

हे वाचा-या आकड्यांनी भरली केंद्र सरकारला धडकी, कोरोनाच्या मोठ्या उद्रेकाची भीती

हे वाचा-ठरलं! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 तारखेला घेणार शपथ

हे वाचा-कोरोना चाचणीचे नियम बदलले; रुग्णांना घरी सोडण्याबाबत सरकारने घेतला नवा निर्णय

संपादन- क्रांती कानेटकर.

First published: May 15, 2020, 7:14 AM IST

ताज्या बातम्या