Home /News /maharashtra /

BREAKING : जळगावात अखेर शिवसेनेनं करून दाखवलं, भाजप सत्तेतून बाहेर!

BREAKING : जळगावात अखेर शिवसेनेनं करून दाखवलं, भाजप सत्तेतून बाहेर!

Jalgaon Municipal Corporation Mayor Election सांगली पॅटर्न राबवत अखेर शिवसेनेनं (Shivsena) भाजपला (BJP) सत्तेवरून खाली खेचत भगवा फडकावला आहे.

    जळगाव, 18 मार्च : जळगाव महापालिकेमध्ये (Jalgaon Municipal Corporation Mayor Election) सांगली पॅटर्न राबवत अखेर शिवसेनेनं (Shivsena) भाजपला (BJP) सत्तेवरून खाली खेचत भगवा फडकावला आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या  (Mayor) आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. सेनेनं तब्बल 45 मतं मिळवली आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकला  आहे. थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे. जळगाव महापालिका महापौरपदाच्य निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील या दोन्ही मतदारांनी निर्णायक आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्‍चित झालेला आहे. त्यांनी बहुमताचा ३८ हा आकडा पार केला आहे. त्यामुळे ते जिंकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शिवसेनेने 45 तर भाजपला 30 मते मिळाली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. ‘OTT च्या कुबड्या वापरणार नाही’; जॉन अब्राहमनं ऑनलाईन चित्रपटांची उडवली खिल्ली   बहुमताचा आकडा पार केल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. महापालिकेच्या बाहेर सेनेच्या कार्यकर्त्यांनी  फटाके फोडून एकच जल्लोष केला आहे. आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखालील सभेत महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक घेण्यात आली . यात प्रारंभी अ‍ॅड. शुचिता हाडा यांनी यांनी उमेदवारीबाबत आक्षेप घेतले. त्यांनी जयश्री महाजन यांच्या अर्जात त्रुटी असून कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर सूचक नसल्याचा दावा केला. मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी ही आक्षेप फेटाळून लावले. याप्रसंगी सभागृहात वाद झाले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोर्टाने भाजपची याचिका फेटाळली विशेष म्हणजे, जळगावमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला हादरा देत 57 पैकी तब्बल 30 नगरसेवक सेनेत दाखल झाले होते. महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने भाजपने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. TMC ला मोठा धक्का, आणखी एक संस्थापक सोडणार पक्ष शिवसेनेच्या तंबूत गेलेल्या फुटीर नगरसेवकांना व्हीप न बजावता आल्यानं भाजपाने कोर्टात याचिका दाखल केली आणि महासभा ऑनलाइन नाही तर ऑफलाइन घेतली तर व्हीप  बजावता येईल, अशी भूमिका मांडली. परंतु,औरंगाबाद खंडपीठाने भाजपची याचिका  फेटाळून लावली. कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक ऑनलाइन घेण्यासाठी कोर्टाने आदेश दिले होते. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. दोन दिवसांपूर्वीच भाजप नगसेवकांनी गाठले ठाणे! सत्ताधारी भाजपचे शिवसेनेनं 27 नगरसेवक फोडून सुरूंग लावला होता. शिवसेनेनं फोडलेले सर्व 27 नगरसेवक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे. सर्व नगरसेवक ठाण्यातूनच ऑनलाईन मतदान केलं हे. नगरसेवक सेनेत दाखल झाल्यानंतर आणखी 5 नगरसेवक शिवसेनेला येऊन मिळाले होते. त्यामुळे भाजपकडे असलेले 57 नगरसेवकांपैकी अर्धे नगरसेवक सेनेच्या गळाला लागले होते.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Jalgaon, Sangli jalgaon municipal corporation, भाजप, शिवसेना

    पुढील बातम्या