जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जळगावातही 'सांगली पॅटर्न', खडसे हिसकावणार भाजपच्या ताब्यातून महापालिका?

जळगावातही 'सांगली पॅटर्न', खडसे हिसकावणार भाजपच्या ताब्यातून महापालिका?

जळगावातही 'सांगली पॅटर्न', खडसे हिसकावणार भाजपच्या ताब्यातून महापालिका?

येत्या दोन दिवसांत नव्या महापौरांची निवड होणार आहेत. यावेळी भाजपचे काही नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जळगाव, 15 मार्च : राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) आता पुन्हा एकदा भाजपला (BJP) आपल्याच होमग्राऊंडमध्ये जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपच्या ताब्यात असलेली जळगाव महापालिकेत (Jalgaon municipal corporation) ‘सांगली पॅटर्न’ (Sangali Pattern) राबवून राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न खडसे यांच्याकडून होणार आहे. या मोहिमेसाठी भाजपचे जवळपास 27 नगरसेवक (27 BJP corporators) राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. 57 सदस्य असलेल्या भाजपकडे महापौरपद आहे. मात्र येत्या दोन दिवसांत नव्या महापौरांची निवड होणार आहेत. यावेळी भाजपचे काही नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजपच्या अनेक बंडखोर नगरसेवकांनी सोमवारी मुंबई गाठली आहे. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, सुरेश दादा जैन यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. हे नगरसेवक सेनेच्या गटात गेले तर शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होईल. गेल्या 5 वर्षात जळगाव जिल्ह्यात तोडफोडीच्या राजकारणात गिरीश महाजन यांनीही जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सत्ता आणली. मात्र या सत्तेला आता सुरुंग लागला आहे. जमिनीच्या वादातून गावात तुफान राडा, 26 वर्षीय तरुणीला जबर मारहाण भाजपला धक्का देण्यासाठी राजकारणातील कट्टर विरोधक असलेले एकनाथ खडसे आणि सुरेश जैन एकत्र येत असल्याचे हे संकेत आहेत. या दोन शक्ती एकत्र झाल्यास आगामी जिल्हापरिषद, महापालिका आणि भविष्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी हे मोठं आव्हान ठरण्याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. जळगाव भाजपमध्ये गिरीश महाजन पर्व सुरू झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या राजकीय खच्चीकरणाची एकही संधी सोडण्यात आली नाही. महापालिका निवडणुकीत खडसे समर्थक एकाही नागरसेवकाला भाजपने तिकीट दिलं नाही. आता त्याच एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपला एक एक धक्का देण्यास सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीमध्ये भाजपने महापालिका सत्ता आणली खरी, पण राज्यात भाजपने सत्ता गमावली. गेल्या वर्षभरात केंद्राचा पैसा वगळता कुठलाही निधी जळगाव महापालिकेला मिळाला नाही. अशा परिस्थितीत अनेक नगरसेवक बेचैन झाले. भाजपात राहून निधी मिळू शकत नसल्याने अनेक नगरसेवक सेना आणि राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याचं दिसत आहे. OMG! हा तर चक्क फ्रिजमध्ये जाऊन बसला, फोटोवर नेटकऱ्यांनी दिल्या धमाल प्रतिक्रिया अशातच सुरेश दादा जैन हे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. जर भाजप विरोधात एकनाथ खडसे आणि सुरेश जैन हे समीकरण जुळून आलं तर भाजपला आगामी जिल्हा परिषद, विधान परिषद निवडणूक सोपी ठरणार नाही. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महापालिकेतील संख्याबळ भाजप -57 शिवसेना - 15 एमआयएम - 3

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात