जाहिरात
मराठी बातम्या / Viral / OMG! हा तर चक्क फ्रिजमध्ये जाऊन बसला, फोटोवर नेटकऱ्यांनी दिल्या धमाल प्रतिक्रिया

OMG! हा तर चक्क फ्रिजमध्ये जाऊन बसला, फोटोवर नेटकऱ्यांनी दिल्या धमाल प्रतिक्रिया

OMG! हा तर चक्क फ्रिजमध्ये जाऊन बसला, फोटोवर नेटकऱ्यांनी दिल्या धमाल प्रतिक्रिया

तुम्ही कधी स्वत:चा फोटो फोटोशॉप केला आहे का?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 मार्च : सोशल मीडियावर दरदिवशीच काय, दर तासाला, मिनिटाला नवनवे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. यातील काही गोष्टी तर नेटकऱ्यांचं मोठंच मनोरंजन करताना दिसतात. (man photoshopped, his photo went viral) असाच एक फोटो सध्या व्हायरल होताना दिसतो आहे. मात्र याला फोटोशॉपनं अजूनच गमतीदार बनवलं आहे. फोटोशॉप ही गोष्ट अनेकदा उपद्रवी पद्धतीनं वापरली जाते. मात्र हलक्याफुलक्या पद्धतीचे फोटोत केलेले बदल आणि त्यातून झालेलं निखळ मनोरंजन हीसुद्धा फोटोशॉपचीच देणगी. (viral photo of man in fridge) सध्या एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक त्याच्या फोटोची खूप मजा घेताना दिसतात. यात तसं फार काही नाही मात्र लोकांना मजा खूप येते आहे. (man sat in fridge viral on twitter) या फोटोंमध्ये दिसतं की एक माणूस चक्क फ्रिजच्यामध्ये बसला आहे. हे फोटोज अर्थातच फोटोशॉप केलेले आहेत. हेही वाचा रिसेप्शनसाठी श्रृंगार करत असताना पतीनं दिलं अनोखं सरप्राइज; रोमॅंन्टिक VIDEO लोक एकदमच धमाल प्रतिक्रिया या फोटोंना पाहून देत आहेत. ( twitter viral photo man in fridge)

जाहिरात

ट्विटरवर @SaeedDiCaprio नावाच्या युजरनं ही मजेदार पोस्ट शेअर केली आहे. सोबतच त्यानं लिहिलं, ‘माझ्या फ्रीजमध्ये एक स्क्रीन आहे. कधीकधी खूप कंटाळा येतो तेव्हा मी स्वतःला फोटोशॉप करून तिथं असल्याचं दाखवत असतो. या पोस्टसोबत युजरनं आपले दोन फोटोज शेअर केले आहेत. हेही वाचा Zomato प्रकरणात आता हा VIDEO ठरला इंटरनेट सेन्सेशन; पाहा कोण खरं आणि कोण खोटं? ही पोस्ट प्रचंडच वेगात व्हायरल झाली. आतापर्यंत 7 हजाराहून जास्त जणांनी या पोस्टवर लाईक दिलं आहे.

ही संख्या अजूनच वाढते आहे. सोबतच या पोस्टला 7 हजार लोकांनी रिट्वीटही केलं आहे.

जाहिरात

सोबतच इतरांनीही विविध कमेंट्स करत मजेदार ट्वीट्स केल्याचं दिसतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात