Home /News /maharashtra /

जमिनीच्या वादातून गावात तुफान राडा, 26 वर्षीय तरुणीला जबर मारहाण

जमिनीच्या वादातून गावात तुफान राडा, 26 वर्षीय तरुणीला जबर मारहाण

या हाणामारीत 26 वर्षीय युवतीला जबर मारहाण झाल्याचा आरोप युवतीने आणि तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

लातूर, 15 मार्च : लातूर जिल्ह्यातल्या (Latur) अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथे जमिनीच्या वादातून (Land dispute) दोन गटात हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून या हाणामारीत 26 वर्षीय युवतीला जबर मारहाण झाल्याचा आरोप युवतीने आणि तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. सध्या जखमी युवतीला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच-ग्रामसेवकासह गावातील एका गटाने मारहाण केल्याचा आरोप पीडित युवतीने केला आहे. यावरून किनगाव पोलीस ठाण्यात युवतीच्या तक्रारीवरून विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हेही वाचा - भाजपच्या उपजिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत, उपचार सुरू दुसरीकडे, पीडित युवती आणि कुटुंबीयांविरोधात ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गावातील जागेवर अतिक्रमण केल्याने सदरील महिलेला ग्रामपंचायतीनं नोटीस दिली होती. शिवाय पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात येण्याचं पत्र देखील पोलिसांना ग्रामपंचायतीनं दिलं होतं. मात्र पोलीस ठाण्यात अपुरं मनुष्यबळ असल्यानं पोलिसांनी तारीख वाढवून मागितली होती. दरम्यान, या सगळ्या मारहाणीच्या घटनेमुळे गावात काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसंच थेट ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकावर गंभीर आरोप करण्यात आल्याने परिसरात या प्रकरणाची मोठी चर्चा होत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Crime, Crime news, Maharashtra, Village, Violence

पुढील बातम्या