Home /News /maharashtra /

Jalgaon mayor election अखेरच्या क्षणी नवे वळण, भाजपने घेतला आक्षेप

Jalgaon mayor election अखेरच्या क्षणी नवे वळण, भाजपने घेतला आक्षेप

महापौर आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून (Shivsena) उमेदवारी करणारे जयश्री महाजन आणि कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर भाजपने आक्षेप घेतला

जळगाव, 18 मार्च : जळगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकीच्या (Jalgaon Municipal Corporation Mayor Election) मतदानाच्या वेळी अचानक नवीन वळण मिळाले आहे.  महापौर (Mayor) आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून (Shivsena) उमेदवारी करणारे जयश्री महाजन आणि कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर भाजपने आक्षेप घेतला असला तरी पिठासीठ अधिकार्‍यांनी याला रद्द केले आहे. तर भाजपने (BJP) या प्रकरणी कोर्टात जाण्याची घोषणा केली आहे. आज पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखालील सभेत महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. यात अ‍ॅड. सुचिता हाडा यांनी यांनी उमेदवारीबाबत आक्षेप घेतले. त्यांनी जयश्री महाजन यांच्या अर्जात त्रुटी असून कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर सूचक नसल्याचा दावा केला. मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी ही आक्षेप फेटाळून लावले. याप्रसंगी सभागृहात वाद झाल्याचे वृत्त आहे. परिस्थिती जैसे थेच! पत्नीला अपशकुनी म्हणत दिला तीन तलाक, FIR दाखल यामुळे निवड प्रक्रिया सुरू असताना स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी ही ऑनलाईन सभा बेकायदेशीर असून भाजप याच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली. ही निवड निवडणूक अधिनियम 2005 च्या प्रमाणे होत नसल्याने आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे निवडणूक प्रक्रिया सुरू असताना उतावळ्या सेना कार्यकर्त्यांनी महापौर आणि उपमहापौर यांच्या विजयाचे बॅनर्स झळकावले आहे. जळगाव महानगरपालिकेचे महापौर उपमहापौरपदाची निवडणूक सुरू असताना निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचा महापौरपदाच्या उमेदवार जयश्री महाजन व उपमहापौर पदाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांचे विजयाचे बॅनर महानगरपालिके बाहेर लावण्यात आले आहे. बापरे! आता ट्रकमध्येही वापरावं लागणार हेल्मेट? पोलिसांनी कापलं हजाराचं चलन निवडणूक होण्यापूर्वीच शिवसेनेच्या उमेदवारांचे विजय बॅनर लावल्याने त्याची शहरात जोरदार चर्चा रंगली असून आपलाच विजय होणार अशी आशा शिवसेनेच्या पल्लवित झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, Sangli jalgaon municipal corporation

पुढील बातम्या