जितेंद्र शर्मा, भोपाळ, 18 मार्च: मध्य प्रदेशची राजधानी असणाऱ्या भोपाळमधून (Bhopal News) गेल्या काही दिवसांपासून तीन तलाक (Triple Talaq) ची काही प्रकरणं समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसात भोपाळमधून हे दुसरं प्रकरण समोर आलं आहे. पिपलानी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हे प्रकरण समोर आलं आहे. या दाम्पत्याचा वर्षभरापूर्वी निकाह (Nikah) झाला होता. मात्र पतीने किरकोळ कारणावरून वाद झाला आणि पत्नीला तीन तलाक बोलून घटस्फोट दिला. पत्नीच्या तक्रारीनंतर पिपलानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान अद्याप या इसमाला पोलिसांनी अटक केलेली नाही.
पोलिसांच्या मते, आरोपी पती फैजल इकबाल आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार वाद होत असत. वादाचं मुख्य कारण हे होतं की वर्षभरापूर्वी जेव्हा त्या दोघांचा विवाह झाला होता त्याच दिवशी या महिलेच्या पत्नीच्या आईचा मृत्यू झाला. त्यामुळे लग्नाच्या आनंदावर विरजण पडलं होतं. आरोपी पतीने तेव्हापासून त्याच्या पत्नीला अपशकुनी ठरवलं होतं. त्यावरून तो तिला बोल लावत असे.
(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये गेली नोकरी म्हणून इंजिनिअर बनला तस्कर; भाजी विक्रीआड विकायचा गांजा)
जेव्हा पीडितेने विरोध केला तेव्हा तो तिच्याशी अभद्र व्यवहार करत असे. या प्रकरणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात चिडल्यानंतर त्याने 14 मार्चला तिला घटस्फोट दिला आणि तो फरार झाला.
आरोपीच्या शोधात पोलीस
पोलिसांनी सांगितले की लवकरच आरोपीला अटक केली जाईल आणि त्याचा शोध सुरू आहे. त्याच पोलिसांचे म्हणणे आहे की मुस्लिम महिला हक्कांच्या संरक्षणाखाली याप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे आणि तपासात गुंतले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhopal News, Crime, Divorce, Police complaint