Home /News /national /

अरे बापरे! आता ट्रकमध्येही वापरावं लागणार हेल्मेट? कापलं हजाराचं चलन

अरे बापरे! आता ट्रकमध्येही वापरावं लागणार हेल्मेट? कापलं हजाराचं चलन

प्रमोदनं परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, की विना हेल्मेट ड्रायव्हिंगप्रकरणी (Driving Vehicle Without Wearing Helmet) हे चलन ट्रकसाठी कापण्यात आलं आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याचं काहीही ऐकलं नाही आणि पैसे भरल्यानंतरच परवान्याचे नूतनीकरण केलं.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 18 मार्च : दुचाकीवर फिरताना हेल्मेटचा वापर केला नाही (Driving Vehicle Without Wearing Helmet) म्हणून एखाद्यावर दंडात्मक कारवाई झाल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. त्यात नवल असं काहीच नाही. मात्र, आता एका अशा दंडात्मक कारवाईबद्दलची माहिती समोर आली आहे, जी ऐकून तुम्हीही बुचकळ्यात पडाल. एका व्यक्तीला हेल्मेट न घालता ट्रक चालवल्याप्रकरणी एक हजार रुपयांचा फटका बसला आहे. याप्रकरणानंतर ओडिशाच्या परिवहन विभागाचा (Odisha Transport Department) हलगर्जीपणा समोर आला आहे. हे प्रकरण ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील आहे. चालक प्रमोद कुमार जेव्हा आरटीओ (RTO) ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा परिवहन विभागाचा हलगर्जीपणा समोर येऊनही त्यांना हे पैसे जमा करावे लागले. काय आहे प्रकरण - प्रमोद कुमार नावाच्या ट्रक चालकाला याबद्दलची माहिती नव्हती. जेव्हा ते ट्रक परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी परिवहन विभाग कार्यालयात पोहोचले तेव्हा त्यांच्या ट्रकचे चलन प्रलंबित असल्याचे त्यांना समजले. अधिकाऱ्यांनी सांगितले की OR-07W/4593 या क्रमांकाच्या गाडीचं चलन कापलं गेलं मात्र रक्कम भरली नाही. यानंतर प्रमोद यांनी हे चलन का कापलं गेलं आहे, असं विचारलं असता हेल्मेट न घालता वाहन चालवल्यामुळे 1000 रुपयांचे चलन वजा करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं. यानंतर प्रमोदनं परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, की विना हेल्मेट ड्रायव्हिंगप्रकरणी हे चलन ट्रकसाठी कापण्यात आलं आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याचं काहीही ऐकलं नाही आणि पैसे भरल्यानंतरच परवान्याचे नूतनीकरण करुन दिलं. प्रमोदनं सांगितलं, की ते मागच्या तीन वर्षांपासून ट्रक चालवतात आणि पाणी पुरवठा करतात. ट्रकच्या परवान्याचं नूतनीकरण करणं गरजेचं होतं. मात्र, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माझंही काहीही ऐकलं नाही. प्रमोदनं सांगितलं, की मला लवकरात लवकर नूतनीकरण करायचं असल्यानं मला हे एक हजार रुपये कारण नसतानाही भरावे लागले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: India, ROAD SAFETY CAMPAIGN, Toll

    पुढील बातम्या