मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Jalgaon Accident : लहान मुलीची भेट झालीच नाही, वाटेतच बापासोबत वाईट घडलं, मोठ्या लेकीनं डोळ्यानं पाहिलं!

Jalgaon Accident : लहान मुलीची भेट झालीच नाही, वाटेतच बापासोबत वाईट घडलं, मोठ्या लेकीनं डोळ्यानं पाहिलं!

जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी येथे भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला.

जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी येथे भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला.

जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी येथे भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

नितीन नांदुरकर (जळगाव), 01 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी येथे भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. लहान मुलीला भेटण्यासाठी मोठ्या मुलीसोबत निघालेल्या दुचाकीस्वार बापाला भरधाव ट्रकने रामदेववाडी गावाजवळ जोरदार धडक दिली.

यामध्ये दुचाकीस्वार चाकाखाली गेल्याने चिरडला गेला. ही दुदैवी घटना काल (दि.31) घडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणला होता यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

हे ही वाचा : एका तंबाखूच्या पुडीने उकललं महिलेच्या हत्येचं गूढ; पतीच निघाला आरोपी

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू दीपक कोळी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे राजू कोळी हे कुटुंबासह वास्तव्याला होते. शेती काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. भडगाव येथील लहान मुलीला भेटण्यासाठी राजू कोळी हे दुचाकीने जळगावहून निघाले.

दुपारी साडे बारावाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात राजू कोळी यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेली मोठी मुलगी सोनी कोळी ही गंभीर जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. 

हे ही वाचा : Sangli : पंढरपूरला निघालेल्या भक्तांवर सिनेस्टाईल दरोडा! दगडफेक, चाकूच्या धाकाचा थरार

नंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी स्वप्निल पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह शववाहिकेतून जिल्हा रूग्णालयात पाठविले. तर जखमीस तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मनहेलवणारा आक्रोश केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

First published:

Tags: Accident, Bike accident, Jalgaon, Major accident