नागपूर, 16 ऑक्टोबर : 'जम्मू काश्मीरमध्ये ( Jammu and Kashmir) भारतीय सेना काही करते तर मानव अधिकाराच्या नावावर भारतीय सेनेला लक्ष केले जाते. हे दुर्दैवी आहे. कलम 370 मुळे व्यवस्था बदलली आहे मात्र संकट अजून टळले नाही. त्यामुळे सुस्थ राहून चालणार नाही' असं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (rss) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केंद्राला सल्ला दिला आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये दोन पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. "आधुनिक लद्दाखचे निर्माता एकोणिसावे कुशोक बकुला" व "जम्मू कश्मीर इतिहासिक परिपेक्ष मे धारा 370 के संशोधन के उपरांत" या दोन पुस्तकांचे प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलत असताना भागवत यांनी जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.
पुन्हा येणे जमेना म्हणून आयकर विभागाच्या धाडी, शरद पवारांची सडकून टीका
'जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सेना काही करते तर मानव अधिकाराच्या नावावर भारतीय सेनेला लक्ष केले जाते. हे दुर्दैवी आहे. काश्मीरमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात राहाचे आहे, 370 नंतर परिस्थिती सुधारली आहे. या आधी 370 च्या आड राजकीय नेते मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार करत होते. पण आता 370 नंतर तो भ्रष्टाचार आता थांबला आहे, असंही भागवत म्हणाले.
'370 नंतर जम्मू काश्मीरमध्ये तीन प्रवाह पाहायला मिळत आहे. एक काश्मिरी पंडितांनी स्थायिक होऊ नये यासाठीचा आंतकवादाचा समर्थन करणारा हा एक मत प्रवाह आहे. दुसरा प्रवाह पाकिस्तान समर्थक फूट पडण्याचा प्रयत्न करणार प्रवाह आहे. तिसरा प्रवाह विकासाचे समर्थन करणारा आहे. मात्र स्वतंत्राचा विचार करणारा आहे. त्यामुळे 370 व्यवस्था बदलली मात्र संकट अजून टळले नाही. त्यामुळे सुस्थ राहून चालणार नाही, असंही भागवत म्हणाले.
Gold Price: ₹48,000 पेक्षा कमी झाले सोन्याचे दर, आता गुंतवणुकीची योग्य संधी?
तसंच, जम्मू काश्मीरमध्ये सरकार संविधानाच्या चाकोरीत राहून काही पण करू शकते. जम्मू काश्मिरासाठी सरकार व्यवस्था तयार करू शकतात, परिवर्तन जनतेला आणि समाजाला आणायचे असते. सनातन काळापासून आपण एक राष्ट्र होतो, आपण आपसात लढलो म्हणून आक्रमणकरणाऱ्यांनी त्याचा फायदा घेतला आणि आता पण घेत आहे. हे होणार नाही यासाठी आपण काम करत राहायला पाहिजे, अस मतही भागवत यांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Article 370, Indian army, Jammu and kashmir, Nagpur, RSS, जम्मू काश्मीर, मोहन भागवत