जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आधी अवैध फोन टॅपिंग प्रकरणात दिलासा, आता रश्मी शुक्ला यांना मिळणार हे मोठं 'गिफ्ट'?

आधी अवैध फोन टॅपिंग प्रकरणात दिलासा, आता रश्मी शुक्ला यांना मिळणार हे मोठं 'गिफ्ट'?

आधी अवैध फोन टॅपिंग प्रकरणात दिलासा, आता रश्मी शुक्ला यांना मिळणार हे मोठं 'गिफ्ट'?

आता पुढील आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना महासंचालक म्हणून नियुक्त केलं जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजपच्या एका मंत्र्याने मंगळवारी दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 26 ऑक्टोबर : एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या विद्यमान पोलीस महासंचालक डॉ. रश्मी शुक्ला यांना नुकतीच क्लिन चीट मिळाली आहे. यानंतर आता पुढील आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना महासंचालक म्हणून नियुक्त केलं जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजपच्या एका मंत्र्याने मंगळवारी दिली आहे. Aditya Thackeray : ‘खोके सरकार’ नंतर आता ‘घोषणा सरकार’ आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर फटकेबाजी 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्त आहेत. डीजी हेमंत नागराळे यांच्यानंतर त्या राज्यातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. त्या राज्याचे DGP IPS अधिकारी रजनीश सेठ यांच्या वरिष्ठ आहेत. शुक्ला या जून 2024 मध्ये निवृत्त होत आहेत. राज्य सरकारने अभय दिल्यावर शुक्ला यांनी केंद्रात पोलीस महासंचालकपदी पात्र ठराव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रात पोलीस महासंचालकपदाकरिता पात्र ठरल्यावर त्या राज्याच्या सेवेत पोलीस महासंचालकपदी येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्या महासंचालकपदावर पात्र ठरल्या नव्हत्या. शिवसेना, भाजप आणि मनसे महायुती होणार का? मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात दिलं उत्तर शुक्ला यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी मागणारा शहर पोलिसांचा प्रस्ताव राज्य सरकारने नुकताच फेटाळला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. 2019 मध्ये या नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी मार्चमध्ये शुक्लांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शुल्का यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त अथवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात येऊ शकते, अशी माहिती आता भाजपच्या एका नेत्याने दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: police
  • First Published :
जाहिरात
जाहिरात