मुंबई, 22 सप्टेंबर : ‘पंतप्रधान, गृहमंत्री गुजरातचे म्हणून सर्व प्रकल्प, उद्योग गुजरातकडे वळवले जात आहेत. त्यासाठी केंद्रातील एक अदृश्य यंत्रणा काम करीत आहे, असे भ्रमाचे वातावरण राष्ट्रीय एकात्मतेसाठी बरे नाही. गुजरातमधील गुंतवणूक वाढीची पोटदुखी महाराष्ट्राला नाही. एकदा भाऊ म्हटल्यावर वाद राहतोच कोठे? महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी’त झाली. त्या खोक्यांची आता वसुली सुरू झाल्याने उद्योग व गुंतवणूकदारांची पळापळ सुरू आहे. पुन्हा उद्योग-व्यापाराची कत्तल करायला महाराष्ट्रावर ‘ईडी’च्या लुटारू फौजा सोडल्या आहेतच, असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. ‘गुजरातमधील गुंतवणूक वाढीची पोटदुखी महाराष्ट्राला नाही. एकदा भाऊ म्हटल्यावर वाद राहतोच कोठे? वाद निर्माण करून दुफळय़ा निर्माण करणारे दुसरेच आहेत. महाराष्ट्र व गुजरातचा जन्म एकाच गर्भातून झाला. दोन्ही राज्ये व बांधव नेहमीच गुण्यागोविंदाने नांदले. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातचे नातेसंबंध काय ते फडणवीस यांनी सांगण्याची गरज नाही. गुजरात पाकिस्तान नाही हे तुम्ही का सांगता? गुजरातची पाकिस्तानशी तुलना करून तुम्ही महाराष्ट्रालाही दुःख देत आहात, अशी टीका सेनेनं फडणवीसांवर केली. (बंगला वाचवण्यासाठी राणेंची दिल्लीत धाव, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल) महाराष्ट्रातील वातावरण उद्योग-व्यापारासाठी सध्या निकोप नाही. महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी’त झाली. त्या खोक्यांची आता वसुली सुरू झाल्याने उद्योग व गुंतवणूकदारांची पळापळ सुरू आहे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाहीच, पण महाराष्ट्राला दुश्मन ठरवले जात आहे. महाराष्ट्राची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान फडणवीस यांच्या समोर आहे. बाकी टक्केवारीचा नवा हिशेब घ्यायला शेलारांचे नियोजन मंडळ आहेच, असा टोलाही सेनेनं शेलारांना लगावला. ‘महाराष्ट्र व गुजरातचा जन्म एकाच गर्भातून झाला. दोन्ही राज्ये व बांधव नेहमीच गुण्यागोविंदाने नांदले. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातचे नातेसंबंध काय ते फडणवीस यांनी सांगण्याची गरज नाही. गुजरात पाकिस्तान नाही हे तुम्ही का सांगता? असा सवालही सेनेनं फडणवीसांना केला. (ठाकरेंवर प्रहार करून मुख्यमंत्री अमित शाहंच्या भेटीला, पुढची रणनीती ठरली!) ‘ठाण्यात कालपर्यंत शिवसेनेच्या नावाने शिंदेच राज्य करीत होते. त्यामुळे भाजपचे ‘शेलार’ ज्या ‘दहा टक्के’ हिशेबाची बात करीत आहेत त्याचा हिशेब ठाण्यातूनच घ्यायला सुरुवात केली पाहिजे व फडणवीस यांनी त्याबाबत चौकशीचे आदेश द्यायला हवेत. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई ही औद्योगिक शहरे आहेत. तेथे एमआयडीसीपासून इतर अनेक प्रकल्प आहेत, पण या औद्योगिक शहरांचा ‘नरक’ कोणी केला? या भागाचे खासदार कोण? या भागातील आमदार शिंदे गटात गेले. नगरसेवकही पेंढाऱ्यांप्रमाणे त्याच टोळीत गेले. शहरे विकून खाणाऱ्यांकडून औद्योगिक प्रगती कशी होणार? ‘मनसे’चे आमदार हे फडणवीस सरकारचे समर्थक आहेत. या भागातील आमदार राजू पाटील यांनी सत्यच समोर आणले. ‘कल्याण-डोंबिवली महानगरपालिका फक्त सेटिंगमध्येच स्मार्ट आहे. मग ती टक्केवारी असो नाहीतर पुरस्कार. येथे फक्त सेटिंग चालते,’ असे सरकार समर्थक आमदार जाहीरपणे बोलतात, असं म्हणत शिवसेनेनं खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







